राष्ट्रवादीकडून इंदापूर विधानसभेचा उमेदवार घोषित ? 

पक्ष बदलण्याचा मोठा इतिहास आहे आणि त्यांचा हा &quotथयथयाट&quot आगामी निवडणुकीत जनतेला मान्य नसणार

राष्ट्रवादीकडून इंदापूर विधानसभेचा उमेदवार घोषित ? 

 नवनाथ बोरकर इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते शशिकांत तरंगे यांचा भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांना इशारा दिला आहे. पाटलांनी अजित पवारांवर आरोप करणे ताबडतोब थांबवावे, अन्यथा त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. असे मत तरंगे यांनी स्पष्ट केले. अजित पवारांनी जनसन्मान यात्रेत इंदापूर विधानसभेच्या उमेदवाराची घोषणा केलीली नसतानाही पाटील यांनाच अन्य पक्षात जाण्यासाठी घाई लागली आहे, असाही आरोप तरंगे यांनी केला आहे. 

 भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी च्या महायुतीत हर्षवर्धन पाटील यांना युती धर्म पाळावा अशी गरज वाटत नाही. तसेच विधानसभा निवडणूक उमेदवारीसाठी अन्य पक्षात जाण्याच्या हालचाली सुरू झाली असल्याचीही माहिती तरंगे यांनी दिली.

 तरंगे यांच्या मते, पाटील यांचा पक्ष बदलण्याचा मोठा इतिहास आहे आणि त्यांचा हा "थयथयाट" आगामी निवडणुकीत जनतेला मान्य नसणार असेही मत त्यांनी मांडले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number