महाराष्ट्राला हर्षवर्धन सदगीरच्या रुपाने नवा महाराष्ट्र केसरी मिळाला आहे. नाशिकचा हर्षवर्धन सदगीर हा 63 वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. विजेत्या हर्षवर्धनला शरद पवारांच्या हस्ते गदा देऊन सन्मानित करण्यात आले.
हर्षवर्धनने लातुरच्या शैलेश शेळकेचा पराभव करत महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली आहे. हर्षवर्धनने शैलश शेळकेचा 3-2 च्या फरकाने पराभव केला.
हा अंतिम सामना पुण्यातील बालेवाडी स्टेडिअममध्ये पार पडला.
हे दोन्ही स्पर्धक काका पवारांचे शिष्य आहेत.
या स्पर्धेला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते.