Haribhau Rathod vs Rahul Narwekar : ‘मी काही लहान माणूस नाही…’; हरिभाऊ राठोड यांचा थेट नार्वेकरांना इशारा

हरिभाऊ राठोड यांनी थेट विधानसभा अध्यक्ष आणि भाजप नेते राहुल नार्वेकरांनाच इशारा दिला आहे.

Haribhau Rathod vs Rahul Narwekar : ‘मी काही लहान माणूस नाही…’; हरिभाऊ राठोड यांचा थेट नार्वेकरांना इशारा

मुंबई : सध्या राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अशातच पक्षांर्तंगत युतीचे समीकरण जुळूत असतानाच एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची तोफही डागली जात आहे. या घमासानात आता बंजारा नेते हरिभाऊ राठोड यांनीही उडी घेतली आहे. राठोड यांनी थेट विधानसभा अध्यक्ष आणि भाजप नेते राहुल नार्वेकरांनाच इशारा दिला आहे. हरिभाऊ राठोड म्हणाले की, राहुल नार्वेकर यांचा निषेध करतो. हरिभाऊ राठोड काय लहान माणूस नाही. या देशाचा बंजारा नेता आहे.⁠ देशभरात आम्ही आंदोलन करणार आहोत. माझी सुरक्षा काढायला लावली आहे. जर मला कमी जास्त झालं तर नार्वेकर तुम्हाला फासावर जावा लागेल. ⁠मी जर वेळेत पोहचलो नाही, असं त्यांचं म्हणणं असेल तर मग इतर उमेदवाराचा अर्ज का घेतला नाही?, मी उद्यापर्यंत या संदर्भात वाट पाहणार आहे. ⁠त्यानंतर पुढील लढाईची रणनिती ठरवू. ⁠याच नार्वेकरांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी गारद करून पक्ष दुसऱ्याला दिला. 

हेही वाचा : BMC Election 2026: निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘मातोश्री’वर पक्षप्रवेशांचा धडाका; ठाकरेंचा शिंदेंच्या सेनेसह काँग्रेसलाही धक्का

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number