Harbour Railway : महत्त्वाची बातमी! गोरेगाव ते सीएसएमटी दरम्यान लोकल सेवा तीन महिन्यांसाठी बंद, कारण…

नव्या मार्गिकांसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी वांद्रे-खार रेल्वेपूल पाडून त्याच्या पुनर्बांधणीसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. 

Harbour Railway : महत्त्वाची बातमी! गोरेगाव ते सीएसएमटी दरम्यान लोकल सेवा तीन महिन्यांसाठी बंद, कारण…

पश्चिम रेल्वे मार्गावर 5व्या, 6व्या मार्गिकेच्या कामासाठी गोरेगाव ते सीएसएमटी दरम्यान लोकल सेवा तीन महिन्यांसाठी बंद करण्यात येणार आहे. नव्या मार्गिकांसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी वांद्रे-खार रेल्वेपूल पाडून त्याच्या पुनर्बांधणीसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. 

2024 मध्ये या कामासाठी 6 महिन्यांचा ब्लॉक घेण्याचे नियोजन होते. मात्र, प्रवाशांची गैरसोय कमी व्हावी यासाठी हा कालावधी 3 महिने करण्यात आला. या प्रकल्पासाठी 964.84 कोटी खर्च होणार आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्यास मुदत देण्यात आली आहे.

हेही वाचा – Bhaskar Jadhav Vs Ramdas Kadam : कोकणात भास्कर जाधव आणि रामदास कदम यांच्यात कलह 

वांद्रे पूर्वेकडील बाजूला 5वी मार्गिका काही वर्षांपूर्वीच तयार करण्यात आली होती, मात्र तत्कालीन राजकीय व स्थानिक विरोधामुळे ती आजपर्यंत कार्यान्वित होऊ शकली नाही.  ही मार्गिका सुरू झाली असती, तर आजचा पूल पाडण्याचा प्रश्नच उद्भवला नसता आणि गोरेगाव-सीएसएमटी लोकल सेवा तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्याची वेळ आली नसती, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number