नंदुरबारमध्ये तरुणीची छेड काढल्याच्या संशयातून रविवारी रात्री 12च्या सुमारास लोकांनी रेल्वे स्थानकावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. रेल्वे स्थानकावर दगडफेक झाल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच यावेळी पोलिसांनी अश्रु धुराचा वापर करत जमावावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. तसेच या घटनेमध्ये पोलिसांनी 3-4 जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.
नंदुरबारच्या रेल्वे स्थानकावर तरुणीची छेड काढल्याच्या संशयातून दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.
या दगडफेकीत काही प्रवासी आणि दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली असून रेल्वे स्थानक परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
जमावावर नियंत्रण मिळवण्याकरीता पोलिसांनी आश्रु धुराच्या नळकांड्या फोडल्या.
मात्र यानंतर पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तसेच नंदुरबार रेल्वे स्थानकावर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे.