Hanuman Jayanti 2025 : जाणून घ्या बजरंगबलीच्या कृपेसाठी शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि साहित्य यादी

पंचांगानुसार, यंदा हनुमान जयंतीच्या दिवशी भद्राचं सावट असणार आहे. त्यामुळे हनुमान जयंतीची पूजा, तिथी, विधी, शुभ मुहूर्त नेमका काय असणार आहे ते जाणून घेऊयात.  

Hanuman Jayanti 2025 : जाणून घ्या बजरंगबलीच्या कृपेसाठी शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि साहित्य यादी

चैत्र पौर्णिमा म्हणजेच भक्ती, पराक्रम आणि हनुमंताची आराधना यांचा संगम. यंदा 12 एप्रिल 2025 रोजी येणारी हनुमान जयंती एका विशेष योगासहित येत आहे ते म्हणजे भद्रायुक्त तिथी!

भगवान हनुमान यांना संकटमोचक, चिरंजीव आणि महाबलशाली देव म्हणून पूजलं जातं. हनुमान जयंतीच्या दिवशी लाखो भक्त उपवास करतात, विशेष पूजा करतात आणि 'हनुमान चालीसा'चे पठण करून आशीर्वाद मिळवतात.

मात्र, पंचांगानुसार, यंदा हनुमान जयंतीच्या दिवशी भद्राचं सावट असणार आहे. त्यामुळे हनुमान जयंतीची पूजा, तिथी, विधी, शुभ मुहूर्त नेमका काय असणार आहे ते जाणून घेऊयात.  

 हनुमान जयंती 2025 ची तिथी आणि वेळा:
पौर्णिमा सुरू:12 एप्रिल 2025, पहाटे 03:21 वाजता

पौर्णिमा समाप्ती: 13 एप्रिल 2025, सकाळी 05:51 वाजता

हनुमान जन्म उत्सव (उदय तिथीप्रमाणे): 12 एप्रिल 2025, शनिवार

ब्रह्म मुहूर्त – सकाळी 04.29 वाजल्यापासून ते 05.14 वाजेपर्यंत असेल. 

अभिजीत मुहूर्त – दुपारी 11.56 ते 12.048 पर्यंत असेल. 

विजय मुहूर्त – दुपारी 02.30 वाजल्यापासून ते 03.21 वाजेपर्यंत असणार आहे.  

 भद्राचा काळ (पूजेसाठी टाळावा):

 भद्रा सुरुवात – सकाळी 05 वाजून 59 मिनिटांनी भद्रा काळ सुरु. 

भद्रा समाप्ती – संध्याकाळी 04 वाजून 35 मिनिटांनी भद्रा काळ समाप्ती. 

भद्राच्या प्रभावात पूजा करणे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे शक्य असल्यास या वेळेनंतरच पूजन करावे.

पूजेसाठी लागणारी सामग्री:
हनुमानाची प्रतिमा किंवा मूर्ती

लाल वस्त्र / लंगोट

लाल फुले, तुळस व माळा

अक्षता, चंदन, धूप व दीप

तूप, पान, सुपारी, लवंग, वेलची

शेंदूर, ध्वज, शंख, घंटा

नैवेद्य: बुंदी लाडू व फळे

हनुमान चालीसा आणि सुंदरकांडचे पठण

(वरील सर्व माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून जय महाराष्ट्र कोणताही दावा करत नाही किंवा कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारत नाही.) 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number