मुंबई : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना सोमवारी रात्री मराठ्यांनी घेरले होते. भररस्त्यात हाकेंच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. त्याचा व्हिडिओ समोर आला. त्यांनंतर वाद निर्माण झाला. आता या घटनेसंदर्भात लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया समोर येत आहे. संभाजीराजेंनी अंगावर मारेकरी घातले. असा आरोप लक्ष्मण हाकेंनी संभाजीराजेंवर केला आहे. तसेच विवेकाचा आवाज दाबला जाणार का ? असा सवालही हाकेंनी उपस्थित केला आहे.