गुलाबराव पाटलांचा राऊतांवर निशाणा

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिल्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट निवडणूक आयोगावरचं गंभीर आरोप केला आहे. धनुष्यबाणाची डील २००० कोटी रुपयांत झाली असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला होता. यावरून आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊतानांच विचारा डिल झालेले पैसे कुठे […]

गुलाबराव पाटलांचा राऊतांवर निशाणा

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिल्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट निवडणूक आयोगावरचं गंभीर आरोप केला आहे. धनुष्यबाणाची डील २००० कोटी रुपयांत झाली असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला होता. यावरून आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊतानांच विचारा डिल झालेले पैसे कुठे ठेवले, नोटा किती होत्या असा निशाणा त्यांनी साधला. तसेच ते सुप्रीम कोर्टात जाणार आहेत असं विचारल्यावर त्यांनी जाऊद्या अस म्हणत खिल्ली उडविली. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील सोमवारी औरंगाबाद विमानतळावर दाखल झाले यावेळी ते बोलत होते.

तसेच या दौऱ्यात जालना जिल्ह्यातील शासकीय योजनांचा ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करणार आहेत. तसेच पाणीपुरवठा विभागाबाबत ज्या काही तक्रारी असतील त्या दूर केल्या जातील. तसेच ज्या काही नवीन योजना सुरू होत आहेत, त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या जाणार आहेत. बऱ्याच तक्रारी माझ्याकडे आले आहेत, त्याचा आढावा घेतला जाणार आहे. सोबतच चांगलं चांगल्या योजनांना शाब्बासकी दिली जाईल. पाणीपुरवठा संदर्भात अनेक तक्रारी आहेत त्या ऐकून निकाली काढण्यात येतील तसेच जे काम करत नसतील त्यांना सुट्टी देण्यात येईल असंही पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number