गुलाबराव देवकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश; चौकशीला सुरूवात

गुलाबराव देवकरांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करताच गुलाबराव देवकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

गुलाबराव देवकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश; चौकशीला सुरूवात

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करताच गुलाबराव देवकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचे कारण म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करून 24 तासही पूर्ण झाले नाहीत, इतक्यात गुलाबराव देवकर यांच्या 10 कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणी चौकशी सुरू झाली आहे.

धुळ्याचे उपजिल्हा निबंधक राजेंद्र वीरकर यांच्या नेत्तृत्वाखाली सुरू असलेले चौकशी पथक जिल्हा बँके येथे दाखल झाले आहे. याप्रकरणी पथकाकडून जिल्हा बँकेत सखोल चौकशी केली जात आहे. तर दुसरीकडे, बँकेकडून चौकशी पथकाला पूर्णपणे सहकार्य केले जात असल्याची माहिती जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी दिली आहे.

शैक्षणिक संस्थेच्या नावावर दहा कोटींचे कर्ज:

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या श्रीकृष्ण शैक्षणिक संस्थेच्या नावावर 10 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. हे कर्ज विधानसभा निवडणुकीदरम्यान घेतल्याचा आरोप मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला होता. त्यासोबतच, हा भ्रष्टाचार लपवण्यासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केल्याची टीकाही गुलाबराव पाटील यांनी केली होती.

हेही वाचा: राजनाथ सिंहांनी जपानी संरक्षणमंत्र्यांची भेट घेतली

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

जरी गुलाबराव देवकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असला तरी त्यांचे घोटाळे काही लपणार नाहीत. हे घोटाळे लपवण्यासाठीच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत जात असल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार अभिमानाने असा दावा करतात की ते लोकांची तपासणी करतात आणि मगच त्यांना पक्षामध्ये भरती करतात. मात्र, गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर असा देखील आरोप केला की ते देवकर सारख्या चांगल्या लोकांची तपासणी करतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number