वाशिष्ठी नदी गाळ प्रश्नावरुन पालकमंत्री उदय सामंत आक्रमक

पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी चिपळूणमधील वाशिष्ठी नदीतील गाळ उपासाबाबत आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.

वाशिष्ठी नदी गाळ प्रश्नावरुन पालकमंत्री उदय सामंत आक्रमक

चिपळूण: पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी चिपळूणमधील वाशिष्ठी नदीतील गाळ उपासाबाबत आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. 'तुम्ही गाळ काढण्यास इतक्या उशिरा का सुरुवात केली?' या प्रश्नाचे उत्तर न दिल्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. नाम फाउंडेशनच्या मशीन येणार होत्या म्हणून शासनाच्या मशिन्स लावल्या नाहीत, हे उत्तर झाले का? या उत्तरासाठी तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे म्हणत सामंत यांनी अधिकाऱ्यांवर निशाणा साधला.

सामंतांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले:

रविवारी, पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान, सामंतांनी वाशिष्ठी नदीतील गाळ उपासाबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी उदय सामंत अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करताना दिसले. सामंत यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले, 'तुमच्यापेक्षा नामने दुप्पट गाळ काढला आहे,' असे उदय सामंत म्हणाले. 'तुम्ही कुठे कमी पडला आहात ते शोधा आणि त्यावर काम करा,' जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत उदय सामंत म्हणाले. चिपळूण येथील वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम संथ गतीने होत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी चुकीची उत्तरे दिल्यानंतर सामंत संतप्त झाले.

हेही वाचा: नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल; शेतकऱ्यांचे कर्ज माफ करवुन घेतल्याशिवाय शांत बसणार नाही

गाळ उपसा केल्यास…

वाशिष्ठी नदीचे गाळ काढल्यामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह नियंत्रित होण्यास मदत होते आणि पूर नियंत्रित होण्यास देखील मदत होते. गाळ काढल्यामुळे नदीचे पात्र खोल होते आणि त्यात जास्त पाणी साठवता येते, ज्यामुळे पूर येण्याची शक्यता कमी होते. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून चिपळूणमधील वाशिष्ठी नदीतून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला आहे. काही तज्ज्ञांनी माहिती दिली आहे की, वाशिष्ठी नदीतून गाळ काढणे आवश्यक आहे. तसेच, काढून टाकलेल्या गाळाची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य उपाययोजना करणे देखील आवश्यक आहे, जेणेकरून नदीतील गाळ पुन्हा साचू नये आणि नदीचा प्रवाह स्थिर राहावा. पावसाळ्यानंतर विविध कारणांमुळे नदीतील गाळ पुन्हा साचतो, त्यामुळे काढून टाकलेल्या गाळाचा अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. म्हणून, काही तज्ञांनी असे म्हटले आहे की गाळाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number