GT vs RR IPL 2026 : …तर कदाचित हा सामना फिरला असता! एक चूक महागात पडली अन् राजस्थाने फायनलमधील स्थान गमावले

आयपीएल 2026 च्या यंदाच्या हंगामातील क्वालिफायर-2 म्हणजेच सेमी फायनल सामना 29 मे रोजी न्यू चंदीगड येथील मुल्लानपूर स्टेडियमवर पार पडला. यावेळी राजस्थानच्या एका चुकीमुळे पूर्ण सामना फिरला.

GT vs RR IPL 2026 : …तर कदाचित हा सामना फिरला असता! एक चूक महागात पडली अन् राजस्थाने फायनलमधील स्थान गमावले

आयपीएल 2026 च्या यंदाच्या हंगामातील क्वालिफायर-2 म्हणजेच सेमी फायनल सामना 29 मे रोजी न्यू चंदीगड येथील मुल्लानपूर स्टेडियमवर पार पडला. यादरम्यान गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला तसेच अंतिम फेरीत प्रवेश करत 31 मे रोजी म्हणजेच उद्या आरसीबी समोर आमनेसामने येणार आहे. दरम्यान क्वालिफायर-2 मध्ये राजस्थानने 20 षटकांत 6 गडी गमावून 214 धावांचे विशाल आव्हान गुजरात समोर उभे केले होते. हे आव्हान पूर्ण करत गुजरात टायटन्सने दमदार फलंदाजीच्या जोरावर 18.4 षटकांत 3 गडी गमावून यशस्वीरित्या विजय गाठला आहे. 

हेही वाचा- GT in IPL 2026 Finals : गुजरातची फायनलमध्ये दमदार एन्ट्री, राजस्थानचा 7 विकेट्सने पराभव

एक चूक अन् पूर्ण सामना फिरला
यावेळी एका चुकीमुळे राजस्थान रॉयल्सचा या स्पर्धेतील प्रवास संपला आहे. कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन ही जोडी मैदानात असताना साई सुदर्शन अवघ्या 14 धावांवर असताना डोनोव्हान फरेराने त्याचा झेल सोडला. नांदे बर्गरच्या बॉलवर मोठा शॉर्ट खेळताना साई सुदर्शन बाद झाला असता पण डोनोवर फरेराने कॅच ड्रॉप केली.

त्यानंतर सुदर्शनने अवघ्या 26 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले, तर गिलने 30 चेंडूंमध्ये शतकी भागीदारी रचून संघाच्या विजयाचा पायाही घातला. यावेळी गिलने अवघ्या 53 चेंडूंमध्ये 104 धावा केल्या. जर साई सुदर्शन आऊट झाला असला तर कदाचित हा सामना फिरला असता. मात्र डोनोवनची ही चूक अखेरीस राजस्थानला महागात पडली आणि अंतिम फेरीतील आपले स्थान गमावून त्यांना त्याची किंमत चुकवावी लागली.

शुभमन गिलचे वादळी शतक; गुजरातचा शानदार विजय
215 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला साई सुदर्शन आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने 167 धावांची मोठी भागीदारी करून मजबूत पाया रचून दिला. साई सुदर्शन 32 चेंडूंत 58 धावा करून 'हिट विकेट' बाद झाला. दुसऱ्या बाजूने शुभमन गिलने कर्णधाराला साजेसा खेळ करत मैदान गाजवले. गिलने 15 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने अवघ्या 53 चेंडूंमध्ये 104 धावांचे शानदार शतक झळकावले. गिल बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने 9 चेंडूंत 16 धावा केल्या. अखेर जोस बटलर (नाबाद 9) आणि राहुल तेवतिया (नाबाद 17) यांनी संघाला 18.4 षटकांत विजय मिळवून दिला आणि अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number