मराठी भाषा गौरवदिनानिमित्त ग्रंथदिंडी

कवि श्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त जागतिक मराठी भाषा दिन साजरा केला जातो या निमित्ताने नाशिक मध्ये देखील आज विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आलं आहे. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून सकाळच्या सुमारास ग्रंथ दिंडी काढण्यात आली. शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी या ग्रंथदिंडीमध्ये लेझीम पथकासह हातात मराठी भाषे संदर्भातील फलक झळकवत उत्साहात सहभाग नोंदवला. […]

मराठी भाषा गौरवदिनानिमित्त ग्रंथदिंडी

कवि श्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त जागतिक मराठी भाषा दिन साजरा केला जातो या निमित्ताने नाशिक मध्ये देखील आज विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आलं आहे. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून सकाळच्या सुमारास ग्रंथ दिंडी काढण्यात आली. शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी या ग्रंथदिंडीमध्ये लेझीम पथकासह हातात मराठी भाषे संदर्भातील फलक झळकवत उत्साहात सहभाग नोंदवला. यावेळी आबाल वृद्धांसह प्रशासकीय अधिकारी, महिलानी यावेळी ग्रंथदिंडीत सहभाग घेतला.

कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात येतो. कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र सरकारने घेतला. दरम्यान नाशिकमध्ये विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी व महानगरपालिका, आणि सार्वजनिक वाचनालय आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे. कालिदास कलामंदिर नाट्यगृहात ग्रामगीता, परिसंवाद, गझल संमेलन, निमंत्रितांचे कवी संमेलन अशा दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी साडे सात ते साडे नऊ ग्रंथदिंडी काढण्यात आली. मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार ‘ग्रामगीता’ सादर करतील. दुपारी साडे बारा वाजता ‘भाषा बदलते की बिघडते या विषयावर परिसंवाद, अध्यक्ष म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील. वक्ते डॉ. राम कुलकर्णी, अहिरे, प्राजक्त देशमुख, प्रशांत केंदळे, संदिप जगताप, राजेंद्र उगले, कविता गायधनी, सुरेश पवार, तुकाराम धांडे, विशाल टलें, गोरख पालवे, रविंद्र देवरे, देविदास चौधरी आणि संतोष हुदलीकर यांची उपस्थिती. सायंकाळी साडे पाच वाजता : गझलसंध्या. अध्यक्ष गझल अभ्यासक पोलिस डॉ. अरुण ठोके, प्रा. डॉ. शंकर अधिकारी सुनिल कडास व बोऱ्हाडे व किरण सोनार. दुपारी गौरवकुमार आठवले. उपस्थिती साडे तीन वा. : कवीसंमेलन होईल. आकाश कंकाळ, राधाकृष्ण अध्यक्ष ऐश्वर्य पाटेकर. प्रा. गंगाधर साळंके आदी.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number