Jaykumar Gore : ‘कर्जमाफीबाबत सरकार मोठा निर्णय घेणार…’; जयकुमार गोरे यांनी सांगितलं महायुती सरकारचं प्लानिंग

&quotलाडकी बहीण योजना आणि कर्जमाफीचा मोठा आर्थिक भार असला, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्व बाबींचा पूर्वविचार करूनच हे धाडसी निर्णय घेण्यात आले आहेत,&quot असे त्यांनी नमूद केले.<br/>

Jaykumar Gore : ‘कर्जमाफीबाबत सरकार मोठा निर्णय घेणार…’; जयकुमार गोरे यांनी सांगितलं महायुती सरकारचं प्लानिंग

Jaykumar Gore :  राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या एका महिन्यात प्रत्यक्ष सुरू होणार असल्याचे स्पष्ट संकेत सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. या संदर्भात बोलताना भाजप नेते आणि प्रशासकीय प्रतिनिधी जयकुमार गोरे यांनी सरकारच्या खंबीर भूमिकेची ग्वाही दिली आहे. “लाडकी बहीण योजना आणि कर्जमाफीचा मोठा आर्थिक भार असला, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्व बाबींचा पूर्वविचार करूनच हे धाडसी निर्णय घेण्यात आले आहेत,” असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा – Sunil Tatkare : राजकीय क्षेत्रातील महत्त्वाची बातमी, सुनील तटकरे भेटले केंद्रीय मंत्री अमित शाहांना; नेमकं कारण काय?

ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकरच; गावांना मिळणार हक्काचा सरपंच
गावखेड्यांचा विकास आणि पायाभूत सुविधा भक्कम करण्यावर भर देताना गोरे म्हणाले की, प्रशासकांपेक्षा लोकप्रतिनिधींच्या हाती कारभार असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे लवकरच ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडतील आणि गावांना त्यांच्या हक्काचा सरपंच मिळेल, जेणेकरून स्थानिक पातळीवर नियोजित विकासकामे वेगाने पार पडतील. धाराशिव जिल्हा परिषदेसह इतर 5 जिल्हा परिषदांनी हाती घेतलेल्या संकल्पित विकासकामांचे आणि तेथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे (CEO) त्यांनी कौतुक केले.

निधीची कोणतीही अडचण नाही; ग्रामविकास खाते पाठीशी खंबीर
शासकीय योजनांमुळे इतर विभागांच्या निधीला कात्री लागेल, अशी भीती व्यक्त केली जात असली तरी गोरे यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. “सरकार पूर्णपणे सक्षम आणि भक्कम आहे. ग्रामविकास खात्याकडे पुरेसा निधी उपलब्ध असून, ग्रामीण भागातील विकासासाठी आवश्यक असणारा 100 टक्के निधी वेळोवेळी पुरवला जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number