सरकारकडून होळी, धुळवडीवरील निर्बंध मागे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी आणि धुळवडीवर घालण्यात आलेले निर्बंध राज्य सरकारने मागे घेतले आहेत. राज्य सरकारने नियमावली सादर केल्यानंतर विरोधकांनी आणि सर्वसामान्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राज्य सरकारने अखेर होळी, धुळवडीवरील निर्बंध मागे घेतले आहेत. त्यामुळे कोरोना काळाच्या दोन वर्षानंतर यंदाची होळी कोरोना निर्बंधमुक्त साजरी करता येणार आहे. राज्याच्या गृहमंत्रालयाने होळी आणि धुळवडीसाठी निर्बंध लागू […]

सरकारकडून होळी, धुळवडीवरील निर्बंध मागे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी आणि धुळवडीवर घालण्यात आलेले निर्बंध राज्य सरकारने मागे घेतले आहेत. राज्य सरकारने नियमावली सादर केल्यानंतर विरोधकांनी आणि सर्वसामान्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राज्य सरकारने अखेर होळी, धुळवडीवरील निर्बंध मागे घेतले आहेत. त्यामुळे कोरोना काळाच्या दोन वर्षानंतर यंदाची होळी कोरोना निर्बंधमुक्त साजरी करता येणार आहे.

राज्याच्या गृहमंत्रालयाने होळी आणि धुळवडीसाठी निर्बंध लागू केले होते. तसेच राज्य सरकारचे हे नियम पाळणे बंधनकारक असल्याचे गृह मंत्रालयाने सांगितले होते. जर हे नियम पाळले नाही तर कायदेशीर कारवाई केली जाण्याचा इशाराही गृह मंत्रालयाने दिला होता. मात्र, आता राज्य सरकारने निर्बंध मागे घेतले असून नवी नियमावली जाहीर केली आहे.

काय आहेत नवे नियम?

कोरोनाच्या नियमांचे पालन करणे.

होळी साजरी करतान गर्दी कमी करावी.

शिमगा साजरा करताना पालखीची मिरवणूक घरोघरी न नेता मंदिरात न्यावी.

होळी आणि धुळवड सणाच्या निमित्ताने गृहखात्याने आधी जी नियमावली जारी केली गेली, त्यावर सरकार आणि विरोधक यांच्यात राजकारण पेटलं होत. निर्बंध फक्त सणांवरच का? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. सणासुदीच्या दिवसांत राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने राज्य सरकारवर टीका केली आहे. तसेच विरोधकांच्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्य सरकारने राज्याच्या हितासाठी नियम बनवले असल्याचे संजय राऊत म्हणाल आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number