मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस मंगळवारी (दि.१३ जून) कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले आहेत. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या निमित्ताने मंत्रिमंडळातील मंत्री हे कोल्हापुरात गेले आहेत. कळंबा येथील तपोवन मैदानावर दुपारी ४ वाजता ‘शासन आपल्या दारी’ योजनेचा कार्यक्रम सुरु होणार आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते जिल्ह्यातील ७५ हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय लाभाचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन, शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मेळाव्याची जय्यत तयारी केली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दुपारी ३.४५ ला कोल्हापूर विमानतळावर जाणार आहेत.