गोवेली महाविद्यालयात पडला कवितांचा पाऊस

गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयात 'पाऊस कवितांचा' या काव्यसादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

गोवेली महाविद्यालयात पडला कवितांचा पाऊस

गोवेली : कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कल्याण ग्रामीण शाखेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थी व रसिक प्रेक्षकांसाठी 'पाऊस कवितांचा' या काव्यसादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी सुरू केलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रात अनेक शाखा कार्यरत आहेत. कल्याण ग्रामीण भागात साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन व्हावे इथल्या बोलीभाषांचे जतन व्हावे तसेच वाचन, लेखन परंपरा समृद्ध व्हाव्यात म्हणून कल्याण ग्रामीण शाखेची स्थापना श्री. रविंद्र घोडविंदे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. या शाखेच्या माध्यमातून हा कार्यक्रम जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे संपन्न झाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number