विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक युतीत प्रवेश करत आहेत. भाजपात पुन्हा मेगा भरती- 2 सुरू झाली असून अनेक दिग्गज नेत्यांनी कमळ हाती घेतले आहेत. राष्ट्रवादी-कॉंग्रेसला राम राम म्हणत भाजपात प्रवेश केला आहे. 1 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीचे नेते धनंजय महाडिक, कॉंग्रेसचे नेते जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत सोलापुरातील दिग्गज नेत्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी राष्ट्रवादी-कॉंंग्रेस पक्षाला राम राम करत भाजपात प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे नातलग आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील दिग्गज नेते राणा जगजितसिंह यांनी भाजपात प्रवेश केला.
राष्ट्रवादीचे नेते धनंजय महाडिक आणि कॉंग्रेसचे नेते जयकुमार गोरे यांनीही भाजपात प्रवेश केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत सोलापुरात भाजपात प्रवेश केला.
महाजनादेशच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप सोलापुरात पार पडला.
यावेळी दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.