राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीकडे येत असताना पुणे–बारामती परिसरात त्यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली. या घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान अजित पवार यांच्याप्रमाणेच भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आणि विनायक मेटे यांचा देखील अपघाती मृत्यू झाला आहे.
गोपीनाथ मुंडे यांचं दिल्लीत अपघाती निधन
2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार देशात आल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळालं होत. त्यानंतर 3 जून 2014 रोजी ते बीडमध्ये येण्यासाठी निघाले असताना गोपनीथ मुंडे यांच्या वाहनाला भरधाव कारनं धडक दिली, ज्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात होती.
विनायक मेटे यांचं मुंबईला जाताना अपघाती निधन
विनायक मेटे हे महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे सदस्य म्हणून काम करायचे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी विनायक मेटे यांचा खारीचा वाटा होता. 14 ऑगस्ट 2022 रोजी मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी मुंबईला जात असताना विनायक मेटे यांच्या कारचा पुणे- मुंबई एक्सप्रेस वेवर अपघात झाला. विनायक मेटे यांनी शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी राज्यभर आक्रमकपणे काम केलं.
अजित पवार यांचा पुणे–बारामतीत विमान अपघाती निधन
महाराष्ट्राचे वित्त मंत्री, बीड आणि पुण्याचे पालकमंत्री, तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात अखेरचा श्वास घेतला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीकडे येत असताना पुणे–बारामती परिसरात त्यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली. या घटनेत ते गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात असून, त्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी पसरल्याने राज्यभर शोककळा पसरली आहे. अजित पवार मुंबईतील कामं आटोपून आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं बारामतीला निघाले होते. बारामती तालुक्यात आज त्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मात्र, पुणे–बारामती परिसरात दाट धुक्यांमुळे त्यांच्या विमानाचा सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी स्फोट झाला. यात अजित पवार यांचं निधन झालं. अजित पवार यांनी आतापर्यंत सहा वेळा उपमुख्यमंत्रिपद भूषवलं आहे.