गुंडांकडून 20 ते 30 गाड्यांची तोडफोड

उत्तर नागपूरमधील यशोधरा नगर पोलीस स्टेशन अंतर्गतच्या तीन वस्त्यांमध्ये गुंडांनी 20 ते 30 गाड्यांची तोडफोड केली आहे. गुंडांच्या दोन गटांतील भांडणाचा परिणाम म्हणून तोडफोड करण्यात आली. गुंडांच्या टोळीनं हातात धारदार शस्त्रं, लाकडी दंडुके घेऊन या गुंडांच्या टोळक्याने परिसरातील वाहनांची नासधूस करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गुंडाच्या या टोळक्याची ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. […]

गुंडांकडून 20 ते 30 गाड्यांची तोडफोड

उत्तर नागपूरमधील यशोधरा नगर पोलीस स्टेशन अंतर्गतच्या तीन वस्त्यांमध्ये गुंडांनी 20 ते 30 गाड्यांची तोडफोड केली आहे. गुंडांच्या दोन गटांतील भांडणाचा परिणाम म्हणून तोडफोड करण्यात आली. गुंडांच्या टोळीनं हातात धारदार शस्त्रं, लाकडी दंडुके घेऊन या गुंडांच्या टोळक्याने परिसरातील वाहनांची नासधूस करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गुंडाच्या या टोळक्याची ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे.

नागपूरच्या वनदेवी नगर, धम्मादीप नगर या वस्त्यांमध्ये गुंडाच्या टोळक्याने रात्री साडे दहाच्या सुमारास हैदोस घातला. यावेळी लोक बाहेर उभी होती पण या गुंडांनी ‘जर कोणी मध्ये आले तर कापून टाकू’ अशी धमकी दिली आणि त्यानंतर गाड्यांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे या भागातील लोक दहशतीखाली आहेत.

यामध्ये जो मुख्य आरोपी आहे जुबेद खान त्याला काल गुलशन बोकडे याच्या टोळीने मारहाण केली. त्याचा बदला घेण्यासाठी रात्री आरोपी झुबेर अब्दुल कुरेशी आणि इतर 8 लोक धारदार शस्त्र घेऊन गेले आणि गुलशन बोकडेचं घर विचारलं. पण तो घरी नसल्यानं त्या गुंडांनी तेथील वाहनांची तोडफोड केली.

यशोधरा नगर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून तोडफोड करणाऱ्या 4 गुंडांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number