पुणेकरांसाठी आनंदाची बातमी…

पुणे, २८ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी:   यंदाच्या गणेशोत्सवात पुणे मेट्रो रात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत केली. पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली. गणेश विसर्जन मिरवणुका वेळेत पार पाडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच यंदाच्या गणेशोत्सवात पुणे मेट्रो रात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याची […]

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी…

पुणे, २८ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी:   यंदाच्या गणेशोत्सवात पुणे मेट्रो रात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत केली. पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली. गणेश विसर्जन मिरवणुका वेळेत पार पाडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच यंदाच्या गणेशोत्सवात पुणे मेट्रो रात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर असून आज त्यांनी दहीहंडी, गणेशोत्सव यावर त्यांनी पुणे महापालिका प्रशासनाला काही सूचना केल्या आहेत.पुण्यातील गणेश विसर्जन वेळेवर पार पाडण्यासाठी दगडूशेठ गणपतीची मिरवणूक ही दुपारीसाडे चार वाजता निघणारअसल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज होणार असल्याचं अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितलं. पुढील आठवड्यात होणाऱ्या दहीहंडीच्या कार्यक्रमात गोविंदा पथकांनी काळजी घेण्याचं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

हडपसर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते १०६ फुटी ध्वजाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पवार म्हणाले की, ७ तारखेला दहीहंडीचा उत्सव आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांना सूचना करण्यात आल्या आहेत. गोविंदांना विम्याचे कवच आम्ही दिले आहे. गणेश मंडळांशी सकारात्मक चर्चा झाली. मिरवणुका वेळेत पूर्व व्हाव्यात यासाठी मंडळांना सुचना केल्या आहेत.

दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक ४:३० वाजता काढण्यास सांगितलं आहे,अशी माहिती अजित पवार यांनी दिली. पुण्यात परदेशी पर्यटक येत असतात. त्यामुळे बारकाईने काळजी घेण्यासाठी पोलिस तयार आहेत.मेट्रो रात्री १२ वाजेपर्यंत सुरु ठेवली जाणार आहे. विशेषत: पाचव्या आणि दहाव्या दिवशी ही सेवा बारा वाजेपर्यंत सुरु राहील. गणेश मंडळांनी एकदा परवानगी घेतल्यास पुन्हा पाच वर्ष परवानगी घ्यायला लागणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number