शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

नाशिक, २५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील राज्यातील ३ लाख ३६ हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ४६५.९९ कोटींचे कांदा अनुदान लवकरच जमा होणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. राज्याच्या पणन विभागाचे सह सचिव डॉ.सुग्रीव धपाटे यांच्याशी कांदा अनुदानाबाबत चर्चा […]

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

नाशिक, २५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील राज्यातील ३ लाख ३६ हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ४६५.९९ कोटींचे कांदा अनुदान लवकरच जमा होणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. राज्याच्या पणन विभागाचे सह सचिव डॉ.सुग्रीव धपाटे यांच्याशी कांदा अनुदानाबाबत चर्चा करून अनुदान वितरण करण्याबाबत माहिती घेतली. त्यानुसार ४६५.९९ कोटीची रक्कम वित्त विभागाने पणन विभागाला वर्ग केली आहे.येत्या दोन- तीन दिवसांत राज्यातील ३ लाख ३६ हजार पात्र लाभार्त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचा शासनाने यापूर्वीच निर्णय घेतलेला होता. राज्यातील सुमारे ३ लाख ३६ हजार ४०० शेतकऱ्यांसाठी ८४४ कोटी रुपये अनुदान अपेक्षित होते. त्यापैकी ५५० कोटीची मागणी मंजूर करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.वित्त विभागाने ४६५.९९ कोटींचा निधी वितरित केला आहे. अजूनही ३७८ कोटी निधी आवश्यक आहे. उर्वरित निधी देखील लवकरच दिला जाईल असे त्यांनी सनगितले.. एकटया नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर १ लाख ७२ हजार शेतकऱ्यांसाठी ४३५ कोटी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील राज्यातील ३ लाख ३६ हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ४६५.९९ कोटींचे कांदा अनुदान लवकरच जमा होणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. राज्याच्या पणन विभागाचे सह सचिव डॉ.सुग्रीव धपाटे यांच्याशी कांदा अनुदानाबाबत चर्चा करून अनुदान वितरण करण्याबाबत माहिती घेतली. त्यानुसार ४६५.९९ कोटीची रक्कम वित्त विभागाने पणन विभागाला वर्ग केली आहे.येत्या दोन- तीन दिवसांत राज्यातील ३ लाख ३६ हजार पात्र लाभार्त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचा शासनाने यापूर्वीच निर्णय घेतलेला होता. राज्यातील सुमारे ३ लाख ३६ हजार ४०० शेतकऱ्यांसाठी ८४४ कोटी रुपये अनुदान अपेक्षित होते. त्यापैकी ५५० कोटीची मागणी मंजूर करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.वित्त विभागाने ४६५.९९ कोटींचा निधी वितरित केला आहे. अजूनही ३७८ कोटी निधी आवश्यक आहे. उर्वरित निधी देखील लवकरच दिला जाईल असे त्यांनी सांगितले.. एकटया नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर १ लाख ७२ हजार शेतकऱ्यांसाठी ४३५ कोटी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number