Dattatray Bharne: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ तारखेपूर्वी होणार 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी; कृषिमंत्र्यांची थेट घोषणा

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.

Dattatray Bharne: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ तारखेपूर्वी होणार 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी; कृषिमंत्र्यांची थेट घोषणा

Dattatray Bharne: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे, राज्यातील सर्व शेतकऱ्यांची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी ही 30 जून पूर्वी दिली जाईल, असे कृषिमंत्र्यांनी थेट तारीख सांगत स्पष्ट केले आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या जागावाटपावर आणि उमेदवारांच्या चाचणीवरही चर्चा झाली. पुणे जिल्ह्यातील जागा आणि मतदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे (अजित पवार गट) असल्यामुळे पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच हक्क आहे, असे भरणे यांनी म्हटले आहे. या संदर्भात सुनेत्रा पवार योग्य तो निर्णय घेतील आणि अंतिम जागावाटपाबाबत महायुतीचे सर्व प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेतील, अशी माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा – Manoj Jarange on Devendra Fadanvis: ‘मुख्यमंत्री आमच्यासाठी शत्रू नाहीत पण…’, देवेंद्र फडणवीसांबद्दल स्पष्टच बोलले मनोज जरांगे

डिझेलसाठी सातबारा मागितल्यास कारवाई; कृषिमंत्र्यांचा पेट्रोल पंपांना कडक इशारा
मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील अनेक भागांत डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची पेट्रोल पंपांवर मोठी झुंबड उडत आहे. मशागतीची कामे खोळंबल्यामुळे शेतकरी 12-12 तास रांगेत उभे असल्याचे चित्र आहे. त्यातच परभणीमध्ये डिझेलसाठी शेतकऱ्यांकडून सातबारा उतारा मागितला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या जाचक अटीची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांकडे डिझेलसाठी सातबारा मागितल्यास संबंधित पंपांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

इंधनाचा खप 20 टक्के वाढला; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे कृषिमंत्र्यांचे आवाहन
राज्यात डिझेल तुटवड्याची केवळ अफवा पसरली असून प्रत्यक्षात कुठेही पेट्रोल-डिझेलची टंचाई नाही, असे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या इंधनाचा खप 20 टक्के वाढला आहे, त्यामुळे लोक घाबरून पंपांवर गर्दी करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्वतः राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा साठा पुरेसा असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कोणताही वेगळा राखीव साठा ठेवण्याची गरज नाही. शेतकऱ्यांनी कोणत्याही चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवून पंपांवर रांगा लावू नयेत, प्रत्येकाला वेळेत डिझेल-पेट्रोल मिळेल, असे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number