‘पन्नास किलोवरील गोण उचलणार नाही’; एपीएमसीमध्ये माथाडी कामगार आक्रमक

१६ डिसेंबरपासून ‘काम बंद’ आंदोलन व्यापारी ५० किलोपेक्षा जास्त माल मागवत असल्याने एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमधील माथाडी कामगारांनी यावर आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सभेचे आयोजन केले होते. माथाडी कामगारांच्या सभेत ५० किलो पेक्षा अधिक वजनाची गोण बाजार समिती आवारात व्यापाऱ्यांनी मागावल्यास येत्या १६ डिसेंबर पासून माथाडी कामगार काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. वाहतूक करण्यात […]

‘पन्नास किलोवरील गोण उचलणार नाही’; एपीएमसीमध्ये माथाडी कामगार आक्रमक

१६ डिसेंबरपासून ‘काम बंद’ आंदोलन

व्यापारी ५० किलोपेक्षा जास्त माल मागवत असल्याने एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमधील माथाडी कामगारांनी यावर आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सभेचे आयोजन केले होते. माथाडी कामगारांच्या सभेत ५० किलो पेक्षा अधिक वजनाची गोण बाजार समिती आवारात व्यापाऱ्यांनी मागावल्यास येत्या १६ डिसेंबर पासून माथाडी कामगार काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.

वाहतूक करण्यात येणाऱ्या मालाचे वजन ५० किलोपेक्षा अधिक नसावे. ही मागणी वारंवार करुनही अधिक वजनाच्या गोणी येत असल्याने माथाडी कामगारांनी जाहीर सभा घेत व्यापाऱ्यांना अंतिम इशारा दिला आहे. शासन निर्णय असतानादेखील जीआर असताना एपीएमसी प्रशासन आणि व्यापारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. तर काही व्यापारी ६० ते ६५ किलो वजनाचा माल मागवत आहेत. व्यापारी व एपीएमसी प्रशासनाने शासन निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास येत्या १६ डिसेंबर पासून माथाडी कामगार ‘काम बंद’ आंदोलन करणार असल्याचा इशारा माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्यासह माथाडी कामगारांनी दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number