Gold-Silver Rate : सोनं अचानक स्वस्त झालं! आजच्या दरांनी ग्राहकांना दिलासा, सोन्याच्या दरात 5 हजारांनी घट?

गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या घरात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, गुंतवणूकदारांचे लक्ष आता एका वेगळ्या धातूने वेधून घेतले आहे.

Gold-Silver Rate : सोनं अचानक स्वस्त झालं! आजच्या दरांनी ग्राहकांना दिलासा, सोन्याच्या दरात 5 हजारांनी घट?

गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या घरात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, गुंतवणूकदारांचे लक्ष आता एका वेगळ्या धातूने वेधून घेतले आहे. सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. भारतीय बाजारात सोन्याच्या घरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज सोन्याचे दर जाणून घ्या… देशात प्रति ग्रॅमच्या दरानुसार, आज 6 फेब्रुवारी 2026 रोजी भारतातील सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर असून, प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 1,53,015 ते 1,57,150 च्या दरम्यान आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम अंदाजे 1,41,554 च्या आसपास आहे. तसेच आजचे सोन्याचे भाव प्रति ग्रॅम 24 कॅरेट 15,301 ते 15,715 इतके आहेत तर, 22 कॅरेट 14,116 ते 14,320 प्रति ग्रॅम आहेत. यामुळे आज 6 फेब्रुवारी रोजी 24 कॅरेट सोन एक हजार 268 ने घटले तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 5 हजार 448 रुपयांची घट पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा- Mumbai-Pune Expressway Traffic : पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील वाहतूक कोंडीचं कोडं सुटेना, तिसऱ्या दिवशीही परिस्थिती जैसे थे…
जाणून घ्या शहरानुसार सोन्याचे दर कसे आहेत?
6 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर असून, मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे दर सुमारे 1,52,797 प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर सुमारे 1,41,989 ते 1,46,998 प्रति 10 ग्रॅम दरम्यान आहेत. पुण्यात 24 कॅरेट दर प्रति ग्रॅम सुमारे 15,944 असून, नाशिक आणि नागपूरमध्येही दर स्थिरतेजीमध्ये आहेत.
मुंबईत प्रति 10 ग्रॅमनुसार 24 कॅरेट सोन्याचा दर 1,52,797 आणि 22 कॅरेट सोनं हे 1,46,000च्या घरात आहे. तर नाशिकमध्ये प्रति 10 ग्रॅमनुसार 24 कॅरेट सोन 1,59,530 तर 22 कॅरेट सोन 1,46,240 च्या घरात आहे. पुणे आणि नागपुरात सोन्याचे दर चढाव-उतारासह उच्च पातळीवर आहेत. पुण्यात प्रति 10 ग्रॅमनुसार 24 कॅरेट सोन 1,59,440 तर 22 कॅरेट 1,46,150 रुपयांच्या घरात आहे. तसेच नागपूरमध्ये प्रति 10 ग्रॅमनुसार 24 कॅरेट सोनं 1,59,000 रुपयांच्या घरात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number