Gold-Silver Price Today : सोने-चांदी दरामुळे भूकंप! शिखरावर पोहोचलेला उच्चांक पत्त्यांसारखा कोसळला; जाणून घ्या आजचे दर

2025 या सरत्या वर्षात सोने आणि चांदीने चांगलाच उच्चांग गाठला. नवीन वर्ष अवघ्या 15 दिवसांवर ठेपला असताना सोन्या-चांदीला पुन्हा झळाळली आहे. सोन्याच्या दरात सातत्यानं तेजी आणि घसरण सुरु असते.

Gold-Silver Price Today : सोने-चांदी दरामुळे भूकंप! शिखरावर पोहोचलेला उच्चांक पत्त्यांसारखा कोसळला; जाणून घ्या आजचे दर

2025 या सरत्या वर्षात सोने आणि चांदीने चांगलाच उच्चांग गाठला. नवीन वर्ष अवघ्या 15 दिवसांवर ठेपला असताना सोन्या-चांदीला पुन्हा झळाळली आहे. सोन्याच्या दरात सातत्यानं तेजी आणि घसरण सुरु असते. समोर आलेल्या निकषांनुसार एकाच दिवसात सोन्याच्या दरात 3000 हजार रुपयांची वाढ होऊन सोन्याने ₹1,34,966 चा उच्चांक गाठला. अशा स्थितीत, सध्या सोन्याचा वायदा दर 1,34,966 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहेत.

हेही वाचा- Dhurandhar Akshaye Khanna Gemini Prompt : 'धुरंदर'मधील खलनायकाच्या लूकचा नवा ट्रेंड, रेहमान डकैतीच्या लूकसाठी तुमच्या फोटोवर AI चा 'हा' प्रॉम्ट वापरा

तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत देखील लक्षणीय चढ-उतार दिसून येत आहे. याचपार्श्वभूमिवर चांदीच्या किमतीत एका दिवसात 8831 रुपयांची घसरण झाली असून चांदीचे दर प्रति किलो 1,92,784 रुपयांवर स्वस्त झाले आहेत. चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली असून शिखरावर पोहचलेला चांदीचा उच्चांक पत्त्यांसारखा कोसळला आहे. दरम्यान गुंतवणूकदारांसाठी तज्ञांकडून महत्त्वाचा सल्ला देण्यात आला आहे.

हेही वाचा- Donald Trump: H-1B व्हिसा शुल्कावरून ट्रम्प प्रशासन अडचणीत; 20 अमेरिकी राज्यांची न्यायालयात धाव

त्यानुसार यूएस फेडरल रिझर्व्हच्या भविष्यातील व्याजदर धोरणाबाबत स्पष्टतेच्या अभावामुळे बाजार अनिश्चित राहिला असून गुंतवणूकदारांनी उच्च पातळीवर नफा-बुकिंग केली, ज्यामुळे किमतींमध्ये आणखी घसरण झाली. तसेच डॉलर निर्देशांक मजबूत होण्याची चिन्हे दर्शवित आहे, ज्याचा परिणाम सोने आणि चांदीसारख्या वस्तूंवर होत आहे. एमसीएक्स सोने-चांदीच्या किमती अनेक घटकांमुळे घसरल्या असून सर्वात मोठा दबाव आंतरराष्ट्रीय बाजारातून आला. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number