Gold-Silver Rate Today: सोनं प्रतितोळा इतक्या रुपयांनी घसरलं, तर चांदीच्या दरातही तब्बल सहा हजारांची घसरण; आजचे ताजे दर जाणून घ्या

जळगावच्या सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे.

Gold-Silver Rate Today: सोनं प्रतितोळा इतक्या रुपयांनी घसरलं, तर चांदीच्या दरातही तब्बल सहा हजारांची घसरण; आजचे ताजे दर जाणून घ्या

जळगावच्या सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दरवाढीनंतर आता पुन्हा एकदा मौल्यवान धातूंच्या किंमतीत घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली असून बाजारात याची जोरदार चर्चा सुरू आहे. आजच्या व्यवहारात सोन्याच्या दरात सुमारे 500 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे जीएसटीसह 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1 लाख 62 हजार 740 रुपयांवर पोहोचली आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात तब्बल सहा हजार रुपयांची घसरण झाली असून जीएसटीसह एक किलो चांदीचा दर 2 लाख 77 हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात सोन्या-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती, डॉलरच्या किमतीतील बदल, कच्च्या तेलाचे दर आणि गुंतवणूकदारांची भूमिका यांचा थेट परिणाम सराफा बाजारावर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर बाजारातील हालचाली अधिक वेगाने बदलताना दिसत आहेत.दरांमध्ये झालेल्या या घसरणीमुळे काही ग्राहक खरेदीसाठी पुढे येताना दिसत असले तरी अनेक जण अजूनही बाजारावर लक्ष ठेवून आहेत. आगामी काळात पुन्हा दर वाढतील की आणखी कमी होतील, याबाबत संभ्रम कायम आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघेही सावध भूमिका घेत असल्याचे चित्र दिसत आहे.

जळगाव हे राज्यातील प्रमुख सुवर्णबाजारांपैकी एक मानले जाते. त्यामुळे येथील दरांमध्ये होणारे बदल संपूर्ण राज्यातील ग्राहकांसाठी महत्त्वाचे ठरतात. सध्या बाजारात अस्थिरता कायम असल्याने पुढील काही दिवसांत सोने-चांदीच्या किंमतींमध्ये आणखी बदल होण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number