Girish Mahajan: गिरीश महाजन यांचे व्हायरल फोटो वादात; सायबर विभागाचा अहवाल समोर, आता होणार…

महाराष्ट्र राज्य सायबर विभागाने यासंदर्भात अधिकृत प्रमाणपत्र जारी केल्याची माहिती समोर आली आहे.

Girish Mahajan: गिरीश महाजन यांचे व्हायरल फोटो वादात; सायबर विभागाचा अहवाल समोर, आता होणार…

 राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संबंधित सोशल मीडियावर व्हायरल झालेली छायाचित्रे तांत्रिक तपासणीनंतर छेडछाड करून तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र राज्य सायबर विभागाने यासंदर्भात अधिकृत प्रमाणपत्र जारी केल्याची माहिती समोर आली आहे.

सायबर विभागाने अद्ययावत डिजिटल फॉरेन्सिक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)तंत्रज्ञानाच्या मदतीने संबंधित छायाचित्रांची तपासणी केली. या तपासात छायाचित्रांमध्ये फेरफार, क्रॉपिंग तसेच डिजिटल एडिटिंग करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी तक्रारदार अमोल शरद पाटील यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) तसेच महिलांचे अश्लील चित्रण प्रतिबंधक कायद्यांतर्गत संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावरून संबंधित छायाचित्रे हटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून विविध प्लॅटफॉर्मना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत.

तपास यंत्रणांनी व्हायरल पोस्ट्सचा उगम शोधण्याचे काम हाती घेतले असून छायाचित्रे तयार करणे, प्रसारित करणे किंवा जाणूनबुजून व्हायरल करण्यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनीही संबंधित छायाचित्रे मॉर्फ केलेली असून त्याद्वारे आपली बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number