Girish Mahajan On Narendra Darade : "ओठात काही पोटात काही, 40 वर्षांच्या राजकारणात…" दराडेंच्या आरोपांवर गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

नाशिकमधून समोर आलेल्या निकालानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दरडे यांनी गिरीश महाजनांसह महायुतीवर तीव्र संताप व्यक्त केला. यानंतर आता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Girish Mahajan On Narendra Darade : &quotओठात काही पोटात काही, 40 वर्षांच्या राजकारणात…&quot दराडेंच्या आरोपांवर गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीत सर्वत्र महायुतीची विजयी घोडदौड दिसून येते आहे. मात्र यावेळेस नाशिकमधून समोर आलेल्या निकालाने सर्वांचे लक्ष विधले. अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंच्या आघाडीने नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतील गणिते बदलली. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते हे मंत्री गिरीश महाजन यांचे अत्यंत जवळचे समजले जातात. याचपार्श्वभूमिवर त्यांच्या विजयानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दरडे यांनी गिरीश महाजनांसह महायुतीवर तीव्र संताप व्यक्त केला. महायुतीच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझा विश्वासघात केला असून विशेष म्हणजे, गिरीश महाजनांनी गोकुळ गीतेंना सर्व ताकद दिली असल्याची खंत दरडेंनी व्यक्त केली. यानंतर आता दरडेंनी महायुतीसह गिरीश महाजनांवर केलेल्या आरोपांवर स्वतः गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

हेही वाचा- Narendra Darade On Nashik MLC Result: “महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझा घात केला” नाशिकचा निकाल लागताच दराडेंकडून संताप व्यक्त

गिरीश महाजन म्हणाले की, “हा निकाल आमच्यासाठीही अत्यंत धक्कादायक आहे. आम्ही खूप प्रयत्न केले. शेवटच्या दिवशी मी पूर्ण वेळ बूथवर होतो. तरीही मतदारांनी कौल आमच्या बाजूने दिला नाही. याठिकाणी महायुतीची पावणे पाचशे मतं होती. 620 पैकी जवळपास पावणे पाचशे मतं महायुतीची होती. तरीसुद्धा इतकी कमी मतं पडली. याचं कारण शोधण्याची गरज आहे. मी एकनाश शिंदे साहेबांना भेटणार आहे. उदय सामंत यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. का झालं, कशामुळे झालं, कोण याठिकाणी आमच्या बाजूने उभं राहिलं नाही, हा खरा संशोधनाचा विषय आहे. याबाबत चौकशी केली जाईल. नरेंद्र दराडे यांनी म्हटलंय की महायुतीने विश्वासघात केला आणि त्यात त्यांनी माझंही नाव घेतलंय.”

“सध्या पराभवामुळे ते वेगळ्या मनस्थितीत आहेत. पण त्यांनाही कल्पना आहे, एकनाथ शिंदेंना, उदय सामंतांना, दादा भुसेंनाही माहीत आहे की आम्ही त्याठिकाणी किती प्रयत्न केले होते. मी असा माणूसच नाही, माझ्या ते रक्तातच नाही.. ओठात काही पोटात काही.. 40 वर्षांच्या राजकारणात हा माझा कधीच स्वभाव राहिलेला नाही. पण दुर्दैवाने आमचा पराभव झाला आहे. याचा धक्का आम्हाला बसला आहे. मी आधीपासूनच म्हणत होतो की 17 पैकी 17 जागा आमच्याच येतील. विरोधी पक्षाला खातंसुद्धा उघडता येणार नाही. ते तंतोतंत खरं झालेलं आहे. नाशिकची वगळली तरी ती जागासुद्धा विरोधी पक्षाला मिळालेली नाही. राज्यात विरोधकांचा अत्यंत दारूण पराभव झाला आहे. पराभूत झाल्यामुळे नरेंद्र दराडे वेगळ्या मानसिकतेत आहेत. त्यांनी महायुतीवर आरोप करणं चुकीचं आहे. असं करणं आमच्या रक्तात नाही, ही आमची संस्कृतीच नाही.”

हेही वाचा- Gokul Gite Win in Nashik : नाशिकमध्ये गणितं बदलली! भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांचा एकतर्फी विजय

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दरडे म्हणाले की, “महायुतीच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझा घात केला. आतून त्यांनाच सपोर्ट केला त्यांचा प्रचार करून त्यांनाच ताकद दिली. मी मात्र महायुतीच्या आशेवर राहिलो. परंतु मी कुठे तरी कमी पडलो. त्यांनी मला अंधारात ठेवून पाडलं. महायुतीतील एकनाथ शिंदे यांना सोडून बाकी सर्व नेत्यांनी माझा विश्वासघात केला. त्यांनी माझ्याबद्दल सांगितलेल्या सर्व गोष्टी खोट्या आहेत. आर्थिक स्थितीत प्रबळ असल्यामुळे मी हरलो. गिरीश महाजनांनी गोकुळ गीतेंना सर्व ताकद दिली. केसाने आमचा गळा कापला.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number