Gayatri Patil : ‘सावित्रीची लेक’! गायत्रीनं दहावीच्या परीक्षेत मिळवले 100 पैकी 100 गुण; सर्वत्र होतयं कौतुक

धारावीतील एका पत्रकाराच्या मुलीने दहावीत 100 टक्के गुण घेत जिल्ह्यातून अव्वल येण्याचा मान मिळविला आहे.

Gayatri Patil :  ‘सावित्रीची लेक’! गायत्रीनं दहावीच्या परीक्षेत मिळवले 100 पैकी 100 गुण; सर्वत्र होतयं कौतुक

धाराशीव : धारावीतील एका पत्रकाराच्या मुलीने दहावीत 100 टक्के गुण घेत जिल्ह्यातून अव्वल येण्याचा मान मिळविला आहे. गायत्री महादेव पाटील असे या विद्यार्थिनीचे नाव असून डॉ. के. डी. इंग्लिश स्कूलची ही विद्यार्थिनी आहे. गायत्रीला पाचशेपैकी 492 गुण मिळाले. तसेच संगीताचे 8 गुण मिळून पाचशेपैकी पाचशे गुण मिळाले. ती सध्या NEET ची तयारी करत आहे. गायत्रीला डॉक्टर होऊन आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. उमरगा शहरातील पत्रकार महादेव पाटील यांची कन्या आहे. यांना तीन अपत्य आहेत. आपल्या यशाबाबत गायत्री सांगते की, सुरुवातीपासूनच चांगले गुण मिळवण्याची माझी इच्छा होती. त्यासाठी मेहनतही घेतली आणि त्याचे फळ मला मिळाले. मी रोज सकाळी लवकर उठून अभ्यास करत होते. मला डॉक्टर होण्याची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया शंभर टक्के गुण मिळवत उमरगा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या गायत्री पाटील हिने व्यक्त केली.

हेही वाचा : SSC Result 2026: महाराष्ट्राच्या लेकींनी पुन्हा मारली बाजी! राज्याचा दहावीचा निकाल 92.9 टक्के; सलग दुसऱ्यांदा कोकणचा डंका, पाहा तुमच्या जिल्ह्याचा निकाल

महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल 92.9 टक्के निकाल लागला आहे. यंदाच्या निकालाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थिनींनी पुन्हा एकदा त्यांच्या गुणवत्तेची मोहोर उमटवली आहे. परीक्षेत प्रविष्ट झालेल्या एकूण विद्यार्थिनींपैकी तब्बल 94.96 टक्के मुलींनी यशाला गवसणी घातली आहे. तर, मुलांच्या उत्तीर्णांची टक्केवारी 89.56 टक्के इतकी आहे. म्हणजेच मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 5 टक्क्यांनी अधिक आहे. बोर्डाचे अध्यक्ष त्रिभुवन कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. यंदा दहावीची परीक्षा 10 दिवस आधीच आयोजित केल्याने निकालही वेळेआधी लावणे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, विद्यार्थ्यांसाठी नऊ विभागीय मंडळांमध्ये समुपदेशकांची आणि हेल्पलाईनची प्रभावी सुविधाही पुरवण्यात आली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number