ठाकरे कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. ठाकरे कुटुंबियावर बेहिशेबी संपत्ती असल्याचा आरोप करत गौरी भिडे यांनी यांचिका दाखल केली होती. न्यायालयाने गौरी भिडे यांची याचिका फेटाळून लावली असून भिडे यांना 25 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
ठाकरे कुटुंबियांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका गौरी भिडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. याचिकेत ठाकेर कुटुंबियांची मालमत्ता बेहिशेबी असल्याचा आरोप भिडे यांनी केला आहे. भिडे आणि त्यांच्या वडिलांनी न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. त्यानंतर 22 नोव्हेंबर रोजी भिडेंच्या याचिकेवर सुनावणी झाली होती. त्यावेळी ही याचिका फेटाळण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा गौरी भिडे यांनी नव्या खंडपीठापुढे धाव घेत याचिका सादर केली.
मात्र, न्यायालयाने भिडे यांची याचिका फेटाळून लावली आहे. तसेच गोरी भिडे यांनी याचिका दाखल केली मात्र, त्यासंबंधी काहीही पुरावे नसल्यामुळे न्यायालयाने गौरी भिडे यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.