नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच व्यावसायिक आणि हॉटेल चालकांसाठी मोठा धक्का बसणारी बातमी समोर आली आहे. आज 1 एप्रिल असून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीने झाली आहे. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधीच महागाई वाढली असताना आता व्यावसायिकांना सिलेंडरसाठी आणखी पैसे मोजावे लागणार आहेत. तेल कंपन्यांनी 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरच्या दरात तब्बल 195.50 रुपयांची वाढ केली आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या वाढत्या किमतींमुळे रेस्टॉरंट मालकांचा खर्च वाढणार असून परिणामी, ते चहा, नाश्ता आणि प्लेटमधील जेवणाच्या किमती वाढवू शकतात. अशातच सध्या सुरु असलेल्या लग्नसमारंभातील केटरिंगसुद्धा महाग होऊ शकते.
यावेळी दिल्लीतील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे नवे दर 2078.50 रुपये आहेत, जे आधी 1883.00 रुपये इतके होते, त्यानुसार नवे दर आणि जुन्या दरांपेक्षा 195.50 रुपयांनी वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे नवे दर 2031.00 रुपये आहेत, जे आधी 1835.00 रुपये इतके होते, त्यानुसार नवे दर आणि जुन्या दरांपेक्षा 196 रुपयांनी वाढल्याचे दिसून येत आहे. तर कोलकातामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे नवे दर 2208.00 रुपये आहेत, जे आधी 1990.00 रुपये इतके होते, त्यानुसार नवे दर आणि जुन्या दरांपेक्षा 218 रुपयांनी वाढल्याचे दिसून येत आहे.
त्याचसोबत चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे नवे दर 2246.50 रुपये आहेत, जे आधी 2043.50 रुपये इतके होते, त्यानुसार नवे दर आणि जुन्या दरांपेक्षा 203 रुपयांनी वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता दिल्लीत सिलेंडरची किंमत 194 रुपये, चेन्नईत 203 रुपये, मुंबईत 196 रुपये आणि कोलकातामध्ये 218 रुपये असेल. त्यामुळे आता व्यावसायिक सिलिंडरचे दर आकाशाला भिडलेले पाहायला मिळणार आहेत. यावेळी सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात लक्षणीय वाढ केली असली तरी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.