Ganesh Chaturthi 2025: तुम्ही पहिल्यांदा घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करणार असाल तर ‘या’ चुका टाळा

जर तुम्ही घरात पहिल्यांदा गणेशाची प्राणप्रतिष्ठा करणार असाल तर काय काळजी घ्यावी, जाणून घ्या. 

Ganesh Chaturthi 2025: तुम्ही पहिल्यांदा घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करणार असाल तर ‘या’ चुका टाळा

Ganesh Chaturthi 2025: गणेशोत्सव एका दिवसावर येऊन ठेपला आहे. हिंदू धर्मात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. हा सण गणपतीला समर्पित आहे. हिंदू धर्मात कोणतेही शुभ काम करताना पहिल्यांदा गणपती बाप्पाची आराधना केली जातो. भाद्रपद महिन्यांच्या कृषण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणेश चतुर्थी असते आणि त्या दिवशी घरात गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. गणेश चतुर्थीला घरामध्ये गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करतात. त्यानंतर मूर्तीची विधीवत पूजा केली जाते. गणेश चतुर्थीच्या दिवसापासून पुढील दहा दिवस गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात मोठ्या दिमाखात गणेशोत्सव साजरा केला जातो. जर तुम्ही घरात पहिल्यांदा गणेशाची प्राणप्रतिष्ठा करणार असाल तर काय काळजी घ्यावी, जाणून घ्या. 

हिंदू पंचांगानुसार, यावर्षी चतुर्थी तिथीची सुरुवात 26 ऑगस्टला दुपारी एक वाजून 54 मिनिटांनी होणार आहे. तर समाप्ती दुसऱ्या दिवशी 27 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून 44 मिनिटांनी होणार आहे. अशा परिस्थितीत गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 27 ऑगस्ट हा शुभमुहूर्त आहे. या वर्षी 27 ऑगस्टला गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. 

हेही वाचा: Hartalika Tritiya 2025: हरतालिकेच्या कथेला विशेष महत्त्व, जाणून घ्या..

घरात कोणत्या प्रकारच्या मूर्तीची स्थापना करावी? 
तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये गणपतीची मूर्ती घेण्यासाठी जाल, तेव्हा तिच्या सोंडेकडे विशेष लक्ष द्या, गणपतीची सोंड डाव्या बाजूला आहे की उजव्या बाजूला आहे ते बघा. हिंदू धर्मातील शास्त्रानुसार डाव्या सोंडेच्या गणपतीचीच मूर्ती गणेशोत्सव काळात घरात स्थापन करावी.

मूर्ती घेताना गणपतीची मूर्ती उभी आहे की, बसलेली याकडे लक्ष द्या. घरात गणपतीची बसलेली मूर्ती आणणं शुभ मानलं जातं. त्यामुळे घराच सुख, समृद्धी येते. गणपतीची मूर्ती घेताना आणखी एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवा. ती म्हणजे गणपतीचा एक हात आशीर्वाद देताना आणि दुसऱ्या हातात मोदक अशाच मूर्तीची निवड करा. अशा प्रकारची मूर्ती शुभ मानली जाते. 

हेही वाचा: Ganesh Chaturthi 2025: ‘या’ पद्धतीने करा गणरायाची प्राण प्रतिष्ठापना, जाणून घ्या शुभ मुहूर्त व पूजा विधी

गणपतीच्या मूर्तीची स्थापना करताना ती ईशान्य दिशेला करा, तिचं तोंड उत्तर दिशेला ठेवा, घरी मूर्ती आणल्यानंतर तिची विधीवत पूजा करुन प्राणप्रतिष्ठा करा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी बाप्पाची आरती करा. यामुळे गणपती बाप्पाच्या कृपा आणि आशीर्वादाने तुमची भरभराट होईल.  

 

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number