मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी रेल्वे लोकलसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीचे २ डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. १५ ऑगस्टपासून सर्वसामांन्यासाठी रेल्वे ट्रॅकवर येणार आहे. मात्र कोरोना लसीचा दुसरा डोस घेऊन १५ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनाच लोकलने प्रवास करता येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
लोकल सेवा सुरु करावी, यासाठी भाजपने आंदोलन केलं होतं. त्याचप्रमाणे अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी विनंती केली होती. त्यामुळे काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासासाठी मान्यता दिली आहे.
मात्र गैरप्रकार टाळण्यासाठी राज्य सरकारकडून एक सिस्टम तयार करण्यात आली आहे. त्यानुसार ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत त्या प्रवाशांना मोबाईल ऍपच्या मदतीने रेल्वे पास डाऊनलोड करता येणार आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, त्यांना शहरातील पालिकेच्या प्रभाग कार्यालयांमधून तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेता येणार आहेत. या पासेसवरील क्यू आर कोडमुळे रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येणार आहे.
pic.twitter.com/BONr8KYkMy — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 8, 2021
कसा मिळवाल रेल्वे लोकलचा पास?