महत्वाची बातमी; 1 जुलैपासून रेल्वे प्रवाशांसाठी लागू होणार नवे नियम

रेल्वे बोर्डाने वेटिंग तिकिटांबाबत एक नवीन नियम जारी केले आहेत. हे नियम 1 जुलै पासून देशभरात लागू होतील. रेल्वेकडून प्रवाशांना एसएमएस, पोर्टल, स्टेशन डिस्प्ले आणि सार्वजनिक सेवा देण्यात येणार आहे.

महत्वाची बातमी; 1 जुलैपासून रेल्वे प्रवाशांसाठी लागू होणार नवे नियम

मुंबई: एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक प्रवासी रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. काहींना कन्फर्म तिकीट मिळते, तर काहींना मात्र कन्फर्म तिकीट मिळत नाही, ज्यामुळे प्रवाशांचे तिकीट वेटिंग लिस्टमध्ये जाते. अशातच, प्रवाशांना हा प्रश्न पडतो की, 'आपलं वेटिंग तिकीट कन्फर्म होईल की नाही?'. या विचाराने अनेकजण निराश होतात. याचे कारण म्हणजे तिकीट कन्फर्म होण्याची खात्री नसते.

मात्र, या समस्येवर उपाय म्हणून रेल्वे बोर्डाने वेटिंग तिकिटांबाबत एक नवीन नियम जारी केले आहेत. हे नियम 1 जुलै 2025 पासून देशभरात लागू होतील. रेल्वेकडून प्रवाशांना एसएमएस, पोर्टल, स्टेशन डिस्प्ले आणि सार्वजनिक सेवा देण्यात येणार आहेत. रेल्वे बोर्डाने केलेल्या नव्या बदलांमुळे अपंग, संरक्षण आणि पोलिसांना दिलासा मिळाला आहे. तसेच, रेल्वेने प्रवाशांना कन्फर्म तिकीट देण्यासाठी वेटिंग तिकिटांची मर्यादा निश्चित केली आहे. एकूण जागांपैकी केवळ 25% जागांना वेटिंग तिकीट देण्यात येणार आहे. हा आदेश रेल्वे बोर्डाचे ईडी (PM) शिवेंद्र शुक्ला यांनी जारी केला आहे.

हेही वाचा: EKNATH SHINDE: आणीबाणीवर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

ही प्रणाली सर्व श्रेणींमध्ये लागू असणार आहे. हे नियम रेल्वे बोर्डाने आदेश जारी केले आहेत. 1 जुलै 2025 पासून देशभरात हे नियम लागू होतील. प्रवाशांना रेल्वेकडून एसएमएस, पोर्टल, स्टेशन डिस्प्ले आणि सार्वजनिक घोषणेद्वारे माहिती दिली जाईल. दुसरीकडे, सध्याच्या बुकिंगमध्ये सीट उपलब्ध झाल्यावर ट्रेनचा पहिला चार्ट (चार तासांपूर्वीा) तयार झाल्यानंतर प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळू शकणार आहे. यामध्ये ऑनलाइन तिकीट बुक करू न शकणाऱ्या प्रवाशांना काउंटरवरून तिकीट काढावे लागेल. यापूर्वी गाड्यांमध्ये थांबण्याची स्पष्ट मर्यादा नव्हती. यामुळे लांबलचक प्रतीक्षा यादी तयार झाली होती, शिवाय प्रवाशांना प्रवासापूर्वी कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता कमी झाली होती.

मोठ्या प्रमाणात वेटिंग तिकीट दिल्याने एजंट आणि दलालांच्या हालचाली वाढल्या होत्या. याशिवाय अपंग, संरक्षण आणि पोलिसांसाठी सवलतीची विशेष व्यवस्था नव्हती. मात्र या बदलांमुळे अपंग, व्हीलचेअर वापरणारे, कॅन्सर, गंभीर आजाराने ग्रस्त प्रवासी, लष्कर, निमलष्करी दल, पोलिस, ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असलेल्या प्रवाशांना सूट मिळणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number