Vinayak Raut: "5 करोड, थ्री रुम फ्लॅट, 2 लाख दरमहा, गाडी आणि…" सुनेच्या आपोरांनंतर राऊतांनी सांगितली ‘ती’ बाजू; काय म्हणाले?

माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी राऊत कुटुंबावर अत्यंत खळबळजनक आणि गंभीर आरोप केले आहेत. यानंतर आता सूनेच्या आरोपावर विनायक राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधून स्पष्टीकरण दिले.  

Vinayak Raut: &quot5 करोड, थ्री रुम फ्लॅट, 2 लाख दरमहा, गाडी आणि…&quot सुनेच्या आपोरांनंतर राऊतांनी सांगितली ‘ती’ बाजू; काय म्हणाले?

माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत राऊत कुटुंबावर अत्यंत खळबळजनक आणि गंभीर आरोप केले आहेत. विनायक राऊत कुटुंबाकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. इतकेच नव्हे तर घरात बळजबरीने गोमूत्र प्यायला दिले गेले, असा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच काळी जादू प्रतिबंधक कायद्यासह इतर संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.

हेही वाचा- Vinayak Raut: विनायक राऊतांच्या सुनेची थेट पोलिसांत धाव; मुलासह संपूर्ण कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल, जादूटोणा आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप

या प्रकरणात तपास सुरू असून संबंधित सर्व आरोपांची पडताळणी केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मात्र, या प्रकरणातील आरोप हे तक्रारदार महिलेने केलेले असून त्यांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे. अद्याप न्यायालयाने कोणालाही दोषी ठरवलेले नाही. यानंतर आता या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मात्र, या प्रकरणातील आरोप हे तक्रारदार महिलेने केलेले असून त्यांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे. अद्याप न्यायालयाने कोणालाही दोषी ठरवलेले नाही. यानंतर आता सून गिरीजा राऊत यांच्या आरोपावर विनायक राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधून स्पष्टीकरण दिले.  

यावेळी विनायक राऊत म्हणाले की, “मी आणि माझ्या कुटुंबीयांवर लावलेले आरोप खोटे आहेत. गीतेश बरोबर तीन वर्षापासून ती पत्नी राहत नाही. तिचे आई वडील पण बाबाबुवा यांच्याकडे येत होते. तर मग तेव्हा का नाही तक्रार केली. 2022 मध्ये घडलेली घटना 2026 मध्ये तक्रार करतात त्यावरून दिसून येत की काळं बेरं आहे. खरं कारण अस की घटस्फोटाची केस फाइल केली. पाच करोड रुपये आणि थ्री रुम फ्लॅट, दोन लाख दरमहा आणि ऊपर गाडी मागितली पहिल्या बैठकीत. दुसऱ्या बैठकीत नंतर दर महा पाच लक्ष आणि दहा करोड मागितले. भावनात्मक त्रासपोटी नुकसान भरपाई दोन करोड म्हणजे एकूण 12 करोड मागितले आणि त्याशिवाय घर आणि गाडी ही मागणी कायम ठेवली.ही मागणी मान्य केली नाही म्हणून तिने असे सगळे प्रकार केली. न्यायालयात गेली आहे. आम्ही इथेच रहात आहोत ठाण्यात सत्र न्यायालय केस दाखल. अघोरी उपचार पूर्णपणे खंडन करतो. 23 तारखेला केस आहे.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number