Prajakt Tanpure : मोठी बातमी! राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे करणार भाजपमध्ये प्रवेश, शरद पवार गटाला धक्का; प्रवेशाची तारीखही ठरली

राहुरी मतदारसंघाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करणार.

Prajakt Tanpure : मोठी बातमी! राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे करणार भाजपमध्ये प्रवेश, शरद पवार गटाला धक्का; प्रवेशाची तारीखही ठरली

अहिल्यानगर : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणं बदलत असताना आता आणखी एक मोठी घडामोड समोर येत आहे. राहुरी मतदारसंघाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झाले आहे. तनपुरे सध्या शरद पवार गटातील राष्ट्रवादी पक्षात असल्याचे हा पवार गटाला मोठा धक्का आहे. दरम्यान, येत्या 30 मे रोजी भाजप पक्ष प्रवेश होईल, असे सूत्रांकडून समजते. तसेच प्राजक्त तनपुरे हे भाजपकडून अहिल्यानगर विधानपरिषद निवडणूक लढवणार असल्याचे समजते. दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीवेळी अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीवेळी प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतली होती. 

हेही वाचा : Sunil Tatkare : ‘मी आणि पटेल यांनीच टीकेचं धनी का व्हायचं?, वरिष्ठ नेतृत्व भूमिका घेणार की नाही?’; राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे प्रचंड चिडले

प्राजक्त तनपुरे यांनी फेसबुक प्रोफाईलला मामा जंयत पाटलांचा फोटो लावत भावनिक संदेश दिला. तनपुरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. तसेच नगरमधील ते मोठे नेते आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात होते. आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number