माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुलाला ईडीचे समन्स

  मनी लाँड्रिंगप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांना इडीने समन्स बजावले आहेत.   अनिल देशमुख यांच्या चौकशीदरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये अनिल देशमुख यांच्या २७ कंपन्यांमध्ये व्यवहार झाला असल्याची माहिती ईडीला मिळाली होती. आणि याप्रकरणी ईडीने अनिल देशमुख यांच्या मुलगा ऋषिकेश […]

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुलाला ईडीचे समन्स

  मनी लाँड्रिंगप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांना इडीने समन्स बजावले आहेत.

  अनिल देशमुख यांच्या चौकशीदरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये अनिल देशमुख यांच्या २७ कंपन्यांमध्ये व्यवहार झाला असल्याची माहिती ईडीला मिळाली होती. आणि याप्रकरणी ईडीने अनिल देशमुख यांच्या मुलगा ऋषिकेश देशमुख यांना समन्स बजावले आहेत. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मात्र, ऋषिकेश देशमुख ईडीसमोर गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे यावर विरोधी पक्षनेत्यांकडून अनेक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुली प्रकरणी अनेक आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीने देशमुखांना समन्ससुद्धा बजावले  होते. मात्र देशमुख ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले नाही. आपल्यावरील कारवाई रद्द करण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. आणि अखेर इतके दिवस बेपत्ता असलेले अनिल देशमुख काल ईडी कार्यालयात हजर झाले. आणि अखेर देशमुखांची कसून चौकशी सक्तवसुली संचालनालयाने देशमुखांना अटक केली आणि आज न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर न करता न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number