केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चांडी काळाच्या पडद्याआड

केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते ओमन चांडी यांचं मंगळवारी पहाटे (१८ जुलै) निधन झालं आहे. केरळ काँग्रेसचे अध्यक्ष के. सुधाकरन आणि चांडी यांच्या जवळच्या नातेवाईकांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे ओमन चांडी हे ७९ वर्षांचे होते. ओमन चांडी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. २०१९ पासून त्यांची प्रकृती खालावलेली […]

केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चांडी काळाच्या पडद्याआड

केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते ओमन चांडी यांचं मंगळवारी पहाटे (१८ जुलै) निधन झालं आहे. केरळ काँग्रेसचे अध्यक्ष के. सुधाकरन आणि चांडी यांच्या जवळच्या नातेवाईकांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे ओमन चांडी हे ७९ वर्षांचे होते. ओमन चांडी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. २०१९ पासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. ओमन चांडी यांना घशाचा आजार झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी जर्मनीला नेण्यात आले होते. केरळ काँग्रेसचे अध्यक्ष के. सुधाकरन यांनी ट्वीट करत ओमन चांडी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमन चांडी यांचं निधन झाल्याचं त्यांनी ट्वीट केलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number