‘परदेशी प्रवाशांची तपासणी करणे गरजेचे’ – राजेश टोपे

दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा विषाणू सापडला असल्यामुळे जगभरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना महत्त्वाची माहिती दिली आहे. काही देशांमध्ये ओमिक्रॉन या नव्या विषाणूचा शिरकाव झाला असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोरोनाचा हा नवीन विषाणू हा […]

‘परदेशी प्रवाशांची तपासणी करणे गरजेचे’ – राजेश टोपे

दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा विषाणू सापडला असल्यामुळे जगभरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना महत्त्वाची माहिती दिली आहे.

काही देशांमध्ये ओमिक्रॉन या नव्या विषाणूचा शिरकाव झाला असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोरोनाचा हा नवीन विषाणू हा भारतात येणार नाही, याची खबरदारी घेतली जात असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मात्र त्यामुळे राज्यसरकारने जाहीर करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

परदेशातून अनेक प्रवासी मुंबईत आले आहेत तर अनेक प्रवासी मुंबईतून इतर शहरात गेले आहेत. त्यामुळे या प्रवाशांना जर या नव्या विषाणूची लागण झाली असेल तर मोठ्या प्रमाणात धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावरच प्रवाशांची पूर्ण तपासणी करणे गरजेचे असल्याचे टोपे यांनी सांगितले. परंतु कोरोना संसर्ग संपण्याअगोदरच या नव्या विषाणूची भीती निर्माण झाल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन केले जाणार असून त्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी घेतली जाणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number