आसाममधील गेल्या दिवसांपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे राज्यातील पूर परिस्थिती गंभीर होत चालली आहे. आत्ता पर्यंत या पुराचा फटका ३२ जिल्ह्यातील ३१ लाख लोकांना बसला आहे. मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या ५४ वर पोहचली आहे. अजून ८ जण बेपत्ता आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे आसाममधील नद्यांना महापूर आला आहे. दरम्यान, एसडीआरएफ च्या पथकांनी 100 हून अधिक जणांची सुखरुप सुटका केली आहे. हे सर्वजण पुरात अडकले होते. या सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
आसाममधील महापुरामुळे राज्याच्या ३२ जिल्ह्यामधील ३१ लाख लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ब्रम्हपुत्र आणि इतर उप नद्यांचे पाणी ४२९१ गावांमध्ये शिरले असून ६६४५५ हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे.राज्यातील २१ जिल्ह्यातील ५१४ आपत्कालीन शिबिरात १. लाखांहुन अधिक लोकांनी आश्रय घेतला आहे. बसली, बकसा, बारपेटा, विश्वनाथ, बोनगाईगाव, कछार, चीरांग, धेमाजी, धुबरी, दिब्रूगढ, दिमा-हसावो, गोलपारा, गोलघाट, होजई, ,कामपूर, काब्री, आंगलॉंग, लखीमपूर, माजोली, मोरीगाव, नगाव, नलबाडी, शिवसागर, सनीतपूर, दक्षिण सल्मारा, तिनसुखिया, आणि उदलगुरी या शहरांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.