अकलूजमध्ये प्रथम महिला केसरी कुस्ती स्पर्धा

राज्यात प्रथमच ताराराणी महिला केसरी स्पर्धेचे उद्घाटन अकलूज येथे झाले. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्यासह सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, संयोजिका शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेचा प्रारंभ ज्योत प्रज्वलित करून झाली. पुढील ३ दिवस मॅटवर ही स्पर्धा होणार […]

अकलूजमध्ये प्रथम महिला केसरी कुस्ती स्पर्धा

राज्यात प्रथमच ताराराणी महिला केसरी स्पर्धेचे उद्घाटन अकलूज येथे झाले. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्यासह सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, संयोजिका शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले.

ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेचा प्रारंभ ज्योत प्रज्वलित करून झाली. पुढील ३ दिवस मॅटवर ही स्पर्धा होणार आहे. यासाठी महाराष्ट्रासह १० राज्यातून ९०० महिला कुस्तीगीर पहिल्या महिला केसरी स्पर्धेसाठी अकलूज येथे दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी आलेल्या महिला कुस्तीगरांची क्रीडा संकुलसह अकलूज इथ हलगीच्या निनादात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी या स्पर्धेच्या संयोजिका शितलदेवी मोहिते पाटील यांनी पुरुष महाराष्ट्र केसरी विजेत्यास ज्या पद्धतीने सरकारी नोकरी मिळते. अगदी त्याच पद्धतीने महिला केसरी विजेती स्पर्धकांना सरकारी नोकरीमध्ये स्थान द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number