Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार अपघातप्रकरणी कर्नाटकमध्ये पहिली FIR दाखल; रोहित पवार यांनी मानले कर्नाटक सरकारचे आभार

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात कर्नाटकमध्ये पहिली FIR दाखल करण्यात आली आहे. 

Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार अपघातप्रकरणी कर्नाटकमध्ये पहिली  FIR दाखल; रोहित पवार यांनी मानले कर्नाटक सरकारचे आभार

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात कर्नाटकमध्ये पहिली FIR दाखल करण्यात आली आहे. आमदार रोहित पवार यांनी 23 मार्च रोजी ही पहिली FIR दाखल केली आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली. तसेच FIR ची कॉपीदेखील माध्यमांना दाखवली. FIR मध्ये तक्रारदाराने महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुठेही तक्रार स्वीकारली गेली नाही. त्यामुळे त्यांना झिरो FIR नोंदवण्यासाठी हाय ग्राउंड्स पोलीस ठाण्याचा संपर्क साधावा लागला. असं कारण देण्यात आलं आहे. बारामती विमानतळाजवळ 28 जानेवारी 2026 रोजी घडलेल्या भीषण विमान अपघात प्रकरणात मोठा खुलासा समोर आला असून, याप्रकरणी अखेर झिरो FIR दाखल करण्यात आली आहे. कर्नाटकातील हाय ग्राउंड्स पोलीस स्टेशनमध्ये ही FIR नोंदवण्यात आली आहे. या अपघातात महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता. मुंबईहून बारामतीकडे जाणारे VT-SSK हे बॉम्बार्डियर लिअरजेट 45 विमान सकाळी सुमारे 8:43 ते 8:45 दरम्यान कोसळले होते. मृतांच्या नातेवाईकांनी, विशेषतः अजित पवारांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी ही तक्रार दाखल केली असून, हा अपघात नसून एक मोठा गुन्हेगारी कट असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचा : Ashok Kharat In Nashik Court : कोर्टाच्या प्रश्नाला अशोक खरातचं उत्तर, अवघ्या दिड तासात कोर्टात काय घडलं? वाचा संपूर्ण टाईमलाईन

महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करूनही FIR नोंदवली जात नसल्याने अखेर कर्नाटकात झिरो FIR दाखल करण्यात आली असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. तक्रारीनुसार, विमान चालवणाऱ्या VSR व्हेंचर्स कंपनीने सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केले होते. विमानाच्या फ्लाइट तासांमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. अधिकृत नोंदीनुसार विमानाचे 4,915 तास उड्डाण झाले असताना प्रत्यक्षात ते 8,000 तासांहून अधिक असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय अपघाताच्या वेळी हवामान प्रतिकूल असतानाही विमानाला लँडिंगची परवानगी देण्यात आली होती. नियमांनुसार किमान 5 किमी दृश्यमानता आवश्यक असताना ती केवळ 2 ते 3 किमी असल्याचे समोर आले आहे. विमानाचे पायलट सुमित कपूर यांच्यावर यापूर्वी मद्यपान करून उड्डाण केल्याचे आरोप होते आणि त्यांना DGCA कडून निलंबितही करण्यात आले होते. तरीही त्यांना या महत्त्वाच्या उड्डाणासाठी नियुक्त करण्यात आले, असा देखील संशय त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच शेवटच्या क्षणी मूळ क्रू बदलण्यात आला, फ्लाइटला 70 मिनिटांचा विलंब झाला आणि रनवे बदलण्याचा निर्णयही संशयास्पद असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या सर्व बाबींवरून हा अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याचा दावा करण्यात आला असून, संबंधित सर्वांवर भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पुढे सुरू असून, संबंधित यंत्रणांकडून अधिक चौकशी केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number