मुंबईतील आगीचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाही आहे. गुरुवारी अंधेरी एमआयडीसीत लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच मुंबईतील जीएसटी भवनाला आग लागली आहे.
मुंबईतील माझगावमध्ये जीएसटी भवन आहे. या जीएसटीला आग लागली आहे. इमारतीच्या आठव्या आणि नवव्या मजल्याला ही आग लागली आहे.
ही आग गंभीर स्वरुपाची असल्याचं सांगितलं जात आहे. मोठ्या प्रमाणावर आगीचे लोट निघत आहेत. आगीच नेमकं कारण अजूनही समजू शकलेलं नाही.
आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निश्मन दलाच्या २० पेक्षा अधिक गाड्या पोहचल्या. मोठ्या प्रमाणावर आग विझवण्याचे काम सुरु आहे.
दरम्यान आग लागल्याची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजिच पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.