परभणी : परभणी रेल्वे स्थानकावरील एटीएमच्या बाजूला असलेल्या वेटींग रुमला आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहाणी झाली नाही.
शहरात शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची दोन दिवसांमधील ही दुसरी घटना आहे.
आज साडेचारच्या सुमारास परभणी रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. गाडीची वेळ झाल्याने वेटींग रुममध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. अचानकपणे वेटींग रुमला आग लागल्याने प्रवाशांची एकच धावपळ झाली.
आग लागल्याने रेल्वे स्टेशनवर धुराचे लोट पसरले होते. घटनास्थळी अग्निशमन दलाने वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.