लाकडाच्या वखारीत अग्नितांडव

भवानी पेठ येथील टिंबर मार्केटमध्ये एका लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. गोडाऊन शेजारील चार घरांना ही या आगीची झळ बसली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून नियंञणात आणली गेली असून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. पहाटे सव्वा चारच्या सुमारास ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग वस्तीमध्ये आणि शेजारील शाळेमध्ये पसरु न दिल्याने मोठा धोका टळला. […]

लाकडाच्या वखारीत अग्नितांडव

भवानी पेठ येथील टिंबर मार्केटमध्ये एका लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. गोडाऊन शेजारील चार घरांना ही या आगीची झळ बसली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून नियंञणात आणली गेली असून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.

पहाटे सव्वा चारच्या सुमारास ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग वस्तीमध्ये आणि शेजारील शाळेमध्ये पसरु न दिल्याने मोठा धोका टळला. सुमारे १० सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा धोका टळला असून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत कोणतीही जिवितहानी झालेली नाही. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासमवेत इतर २० अधिकारी आणि जवळपास १०० जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुणेमनपा- पुणेकॅन्टोमेंट-पीएमआरडीए-पिंपरीचिंचवड अग्निशमन दल अशी एकुण जवळपास ३० अग्निशमन वाहने आणि खाजगी वॉटर टँकरही या ठिकाणी दाखल झाले आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लीक करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number