राज्यात सध्या स्वयंघोषित बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. धर्माच्या नावाखाली महिलांशी अश्लील कृत्ये केल्याचा खरातचे अनेक व्हिडिओ समोर आले असून आरोपी कॅप्टन अशोक खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान पोलिसांना सुमारे 58 अश्लील आणि अघोरी कृत्यांचे व्हिडिओ मिळाल्याची माहिती होती. मात्र त्याच्या लैंगिक शोषणाचे 58 नाहीतर 100 पेक्षा अधिक व्हिडीओ असल्याची धक्कादायक माहिती नाशिकमध्ये पार पडलेल्या SIT च्या बैठकीतील पोलीस सूत्रांनी दिली आहे. तसेच खरातच्या घराच्या झाडाझडतीत 2 लॅपटॉप, 8 लाखांची रोकड, पिस्तुल, जीवंत काडतुसे आणि मालमत्तांची कागदपत्रे मिळाली आहे.
हेही वाचा- CM Devendra Fadnavis : महिलांना गोळ्या दिल्या, गर्भपात केला! मुख्यमंत्र्यांनी खरातच्या गुन्ह्यांचा पाढा वाचला, सांगितल्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना
तपासादरम्यान अशोक खरात विरोधात तक्रारदारांचा आकडा वाढत चालला आहे. आतापर्यंत त्याच्याविरोधात एकूण 6 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तसेच सध्या पोलिस कस्टडीमध्ये असलेल्या भोंदू अशोक खरातची SIT चौकशी पूर्ण झाली असून आज दुपारी 3.50 वाजता अशोक खरातच्या तोंडावर काळा कपडा बांधून पोलिसांच्या गराड्यात नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. आतापर्यंत तपासात काय निष्पन्न झाले, याबाबतीत पोलिसांकडून न्यायालयात माहिती दिली. दरम्यान सरकारी वकिलांनी अशोक खरात याच्या 7 दिवासांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. दुसऱ्या बाजूला खरातच्या वकिलांनी पोलीस कोठडी वाढविणे गरजेचे नसल्याचा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान नाशिक सत्र न्यायालयात कोर्टात युक्तिवाद सुरू असताना अशोक खरातने देखील काही म्हटले, तसेच कोर्टात युक्तिवादादरम्यान न्यायालयात आज काय काय घडलं ते जाणून घ्या…
हेही वाचा- Trupti Desai : भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण कसं उघड केलं? तृप्ती देसाईंनी सांगितली लैंगिक शोषण आणि फसवणुकीची धक्कादायक 'इनसाईड स्टोरी'
अशोक खरात कोर्टात काय म्हणाला?
कोर्टात युक्तिवाद सुरू असताना खरात आपले बोट बघत मान खाली घालून उभा होता. खरात विषयी समोर आलेल्या माहितीवर न्यायाधीश यांनी खरातला काही बोलायचं आहे का? असं विचारलं. यावर अशोक खरात पाच वाक्य म्हणाला ज्यात पहिलं होत, "मला साप वाघ या विषयी काही माहिती नाही… मी हे पहिल्यांदाच ऐकतोय. मी मंदिरात शिवरात्र, श्रावणी सोमवारी आशा वेळी जात होतो. त्यावेळी जवळपास 100 च्या आसपास लोक तिथे असायची… 5 दिवसांच्या कोठडीत जे प्रश्न विचारले त्याची सगळी उत्तरं मी दिली आहे."
हेही वाचा- Supreme Court : हिंदू, बौद्ध किंवा शीख धर्माव्यतिरिक्त इतर धर्मामध्ये धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा होईल रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
नाशिक सत्र न्यायालयात सरकारी वकिलांनी काय सांगितले?
खरातने खडे कुठून आणले? जे मिश्रित पाणी द्यायचे ते कुठून आणले? 21 जिवंत काडतुसे सापडले, 5 वापरलेले जिवंत काडतुसे सापडले… कस्तुरी वापरत होता, ते हरणाची शिकार करून आणली का? त्याचा तपास करायचा आहे. सिद्ध दोष पूजा करण्यासाठी तो सांगायचा… वाघ, साप दाखवायचा ते जिवंत होते की नकली? ते तपास करायचा आहे. पीडित महिलांची संख्या वाढत आहे त्यानुसार पोलीस कस्टडी हवी आहे. अघोरी कृत्याचा कायदा असताना देखील ते कृत्य करत होता. घर झडतीत राजमुद्रा मिळालेले आहेत. आयओनी किरण सूर्यवंशी आणखी पोलीस कस्टडी मागितली आहे. पिस्टल जप्त केले त्यात 5 जणांचा नरबळी दिल्याचा संशय आहे. मालमत्ता कागदपत्रे मिळाले आहे, अनेकांना त्याने फसविले आहेत, त्याच्या तक्रारी पुढे आहेत. आरोपी 67 वर्षाचा आहे तो 30 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करताना दिसतो. मागे 7 दिवसांचा पीसीआर दिला होता, त्या तपासात अघोरी कृत्य समोर आले आहे. साप कुठून आणत होता त्याचा तपास करायचा आहे. हरणाची शिकार केल्याचा संशय आहे, त्याने अनेकांना कस्तुरी दिली आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणात डिजिटल पुरावे जमा करायची आहे, आणखी 7 दिवसांचा वाढीव पीसीआर द्यावा. यानंतर आता पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.