अखिल भारतीय व्याघ्र प्रकल्पातील कोलोरा वनपरिक्षेत्रात सर्वेक्षण करण्यास गेलेल्या वनरक्षकाचा मृत्यू झाला आहे. सकाळी आठच्या सुमारास वनरक्षक स्वाती ढुमनेवर वाघिणीने हल्ला करून ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
वाघाने हल्ला केलेली ही घटना ताडोबा अभयारण्याच्या कोलारा वनक्षेत्रात ९७ पाणवठा जवळ घडली आहे. दिनांक २० नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबरपर्यंत सर्व वनक्षेत्रात व्याघ्र सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली असून ट्रान्झिट लाईनद्वारे सर्वेक्षण केले जात आहे. त्यासाठी शनिवारी सकाळी ताडोबा कोर वनपरीक्षेत्रातील वनरक्षक स्वाती ढुमणे ही इतर सहकाऱ्यांसोबत जात होते. वाटेत दबा धरून असलेल्या वाघिणीने अचानक हल्ला करून त्यांना ओढीत नेले. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती वरिष्ठ वन अधिकाऱ्यास देण्यात आली असून वरिष्ठ अधिकारी त्वरितच घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली.