मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर बुधवारी रात्रीच्या सुमारास किलोमीटर ४ च्या दरम्यान भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. अंकुश माने असे मृत चालकाचे नाव आहे. खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलि़स पुढील तपास करत आहेत. खोपोली पोलिसांनी तत्काळ तेथे धाव घेऊन मृत वाहन चालकाच्या कुटुंबाशी संपर्क […]

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर बुधवारी रात्रीच्या सुमारास किलोमीटर ४ च्या दरम्यान भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. अंकुश माने असे मृत चालकाचे नाव आहे. खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलि़स पुढील तपास करत आहेत. खोपोली पोलिसांनी तत्काळ तेथे धाव घेऊन मृत वाहन चालकाच्या कुटुंबाशी संपर्क साधला. चालकाचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी खोपोली नगर पालिका रुग्णालयात नेण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, एम.एच ४६ बीबी ९६७३ या ट्रकचा टायर पंक्चर झाला होता. त्यामुळे तो शोल्डर लेन वर कडेला उभा होता. त्याला मागून आलेल्या एम.एच. ११ सी.एच. ४१७२ या वाहनाची पाठीमागून धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की मागच्या वाहनाची केबिन पूर्ण दबली गेली आणि त्यामुळे त्यात अडकून चालकाचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. एक्सप्रेस वे वरील मुंबईकडे जाणाऱ्या बाजूस किलोमीटर ४०.०० च्या दरम्यान झालेली घटना.

आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्गावरील क्रेन ऑपरेटर्स, महामार्गावरील बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, आपदा मित्र आणि अपघातग्रस्तांचा मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्यानी या अपघातात मदत कार्य केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number