शेतकरी मोर्चावर ठाम

किसान सभेसोबत होणारी बैठक सरकारकडून पुढे ढकलण्यात आलीय. शिष्टमंडळाला मंगळवारी मुंबईत चर्चेसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र आता ही बैठक मंगळवारी होणार नाही असा निरोप देण्यात आला आहे. ही बैठक कधी होणार याबाबतही कोणताही निरोप देण्यात आलेला नाही. या प्रकारामुळे किसान सभेचे नेते संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यांचा निर्धार पक्का आहे, आम्ही मुंबईच्या दिशेने चालतच राहणार असं […]

शेतकरी मोर्चावर ठाम

किसान सभेसोबत होणारी बैठक सरकारकडून पुढे ढकलण्यात आलीय. शिष्टमंडळाला मंगळवारी मुंबईत चर्चेसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र आता ही बैठक मंगळवारी होणार नाही असा निरोप देण्यात आला आहे. ही बैठक कधी होणार याबाबतही कोणताही निरोप देण्यात आलेला नाही. या प्रकारामुळे किसान सभेचे नेते संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यांचा निर्धार पक्का आहे, आम्ही मुंबईच्या दिशेने चालतच राहणार असं किसानसभेचे नेते अजित नवले यांनी म्हटले आहे.

शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा नाशिकहून मुंबईत लाल वादळ धडकणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि इतर समविचारी संघटना एकत्र येऊन लाँगमार्च काढला आहे. नाशिकच्या दिंडोरीमधून रविवारपासून निघालेल्या मोर्चाने सोमवारी नाशिकमार्गे मुंबईकडे कूच केले. शेतमालाला योग्य भाव मिळावा, अवकाळीने झालेल्या नुकसानाची तातडीने भरपाई मिळावी त्याचसोबत, वनजमिनींचा हक्क मिळावा यांसह इतरही मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा हा एल्गार पुकारलाय. नाशिकमध्ये एकत्र जमून, नंतर मजल-दरमजल करत हा लाँगमार्च मुंबईत येऊन धडकणार आहे.

शेतमालाला अत्यल्प भाव, वनजमिनींचा प्रश्न, गॅस दरवाढ यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि समविचारी संघटनांच्या वतीने दिंडोरी ते मुंबई असा मोचा काढण्यात आला आहे. रविवारपासून निघालेल्या मोर्चाने सोमवारी नाशिकमार्गे मुंबईकडे कूच केले. २३ मार्च रोजी हा मोर्चा विधान भवनावर धडक देणार आहे. माजी आमदार जीवा पांडू गावित, डॉ. डी. एल. कराड, अजित नवले, तानाजी जायभावे आदी नेते मोर्चाचे नेतृत्व करीत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number