Farmers Protest In Mumbai : कोकणातल्या काजू, आंबा बागायतदारांकडून आंदोलनाची हाक; पोलिसांकडून राजू शेट्टी आणि जानकरांची उचलबांगडी

आंबा काजू बागायतदार यांना योग्य तो उदर देण्यात यावा यासाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

Farmers Protest In Mumbai : कोकणातल्या काजू, आंबा बागायतदारांकडून आंदोलनाची हाक; पोलिसांकडून राजू शेट्टी आणि जानकरांची उचलबांगडी

आंबा काजू बागायतदार यांना योग्य तो उदर देण्यात यावा यासाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला विरोधी पक्षाने पाठिंबा दिला असल्यामुळे आंदोलन गिरगाव चौपाटीपासून वर्षा बंगल्यापर्यंत करण्यासंदर्भातला इशारा राजू शेट्टी यांनी दिला. मात्र पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिली नसल्यामुळे गिरगाव चौपाटी येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावून अनेक आंदोलकांना आझाद मैदानाच्या दिशेला परत पाठवण्यात येत आहे. तसेच राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रवक्त्यांना मात्र पोलिसां तर्फे ताब्यात घेण्यात येत आहे. 

हेही वाचा- Pune Hospital Bomb : हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचं प्रकरण! पुणे पोलिसांकडून मोठे खुलासे समोर; ‘त्या’ कारणास्तव बॉम्ब ठेवल्याची माहिती

आज कोकणातील आंबा, काजू बागायतदारांचा वर्षावर मोर्चा वळवला आहे. सायंकाळी 4 वाजता गिरगाव चौपाटी ते वर्षा निवासस्थान असा हा मोर्चा काढण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मागण्या बागायदार त्यांच्यापर्यंत पोहोचविणार आहेत. अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे नुकसान झालेले कोकणातील आंबा व काजू बागायदारांनी आज आपल्या विविध मागण्यांकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी मोर्चा काढला आहे.

राजू शेट्टी, विनायक राऊत आणि इतर शिवसेना मधील नेते या मोर्च्यात हजर असून महाविकास आघाडी मधील छोटे पक्ष ही या मोर्च्यात सामील झाले आहेत. दरम्यान कोकणातील काजू आणि आंबा उत्पादकांसह शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शेकापचे जयंत पाटील, शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत आणि इतर नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे आंदोलक करणारे शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number